प्रश्नांची सरबत्ती झाली, दीपिकाला आले रडू

युगंधर ताजणे
Sunday, 27 September 2020

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अनेक घटना, संदर्भ यामुळे भलताच चर्चेत आला आहे. त्यात बाँलीवुडच्या कलाकारांचा असणारा सहभाग ड्रग्जच्या प्रकरणावरुन पुढे येत आहे. आतापर्यत ज्या कलाकारांना चौकशीसाठी बोलविण्यात आले त्यांच्यामागील तपासाचा ससेमिरा काही चुकणार नसल्याने एनसीबीच्या कारवाईतुन दिसुन येते.

मुंबई - बाँलीवुडची अभिनेञी दिपिका पदुकोण हिला एनसीबीकडुन चौकशीसाठी बोलविण्यात आले. पाच तासांहुन अधिक चाललेल्या या चौकशीतुन काही महत्वाचे धागे दोरे हाती लागतील असा विश्वास एनसीबीच्या तपास अधिका-यांना आहे. एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू असुन एनसीबीच्या विशेष पथकाने कुलाबा येथील विश्राम गृहावर अभिनेत्री दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्याकडे चौकशी करण्यात आली. 

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अनेक घटना, संदर्भ यामुळे भलताच चर्चेत आला आहे. त्यात बाँलीवुडच्या कलाकारांचा असणारा सहभाग ड्रग्जच्या प्रकरणावरुन पुढे येत आहे. आतापर्यत ज्या कलाकारांना चौकशीसाठी बोलविण्यात आले त्यांच्यामागील तपासाचा ससेमिरा काही चुकणार नसल्याने एनसीबीच्या कारवाईतुन दिसुन येते. दीपिका पदुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्याकडे चौकशी केली. दोघींना समोरासमोर आणून अंमलीपदार्थांचे सेवन, पुरवठा आदीबाबत प्रश्न विचारण्यात आले. ‘इंडिया टुडे’ ने दिलेल्या एका वृत्तानुसार, या चौकशीदरम्यान दीपिकाला रडू आल्याचे म्हटले आहे.

एनसीबीकडुन दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुलचे मोबाइल फोन्स जप्त

एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू आहे.
सध्या बाँलीवुडच्या बड्या कलाकारांना तपासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यामागील गुढ नेमके काय आहे, याबद्दल अनेकांना कुतुहल आहे.  बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाला समन्स बजावले. तीन वर्षांपूर्वी करिश्माने एका व्यक्तीसोबत साधलेला संवाद एनसीबीच्या हाती लागला. त्यात करिश्मा ‘डी’ असे नाव सेव्ह केलेल्या व्यक्तीसोबत चरसबाबत चर्चा करत होती. ही डी नावाची व्यक्ती दीपिका असावी असा संशय एनसीबीला होता.
 चौकशीदरम्यान दीपिकाने ड्रग्सचं सेवन केल्याचं नाकारलं. त्याचसोबत व्हॉट्स अॅप चॅट खरे असल्याची कबुली दिली.

सुशांत ड्रग्ज घ्यायचा मी ड्रग्ज घेतलं नाही : सारा अली खान

एनसीबीने दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह या चार अभिनेत्रींचे मोबाइल फोन्स जप्त केले आहेत. या चार अभिनेत्रींसोबतच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश, सिमोन खंबाटा आणि जया साहा यांचेसुद्धा फोन्स जप्त करण्यात आले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika started crying during the interrogation