रियाच्या घरी सामानामध्ये लपवून पाठवला गेला होता गांजा, कुरिअर बॉयने दिपेश आणि शौविकला ओळखलं

rhea courier marijuana
rhea courier marijuana

मुंबई- रिया चक्रवर्ती सध्या ड्रग्स प्रकरणी भायखळा जेलमध्ये आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात ड्रग्सची देवाणघेवाण केल्याचा आरोप रियावर असून एनसीबीने तिला यात अटक केली आहे. एनसीबी रिया चक्रवर्तीबाबत दर दिवशी एक नवीन खुलासा करत आहे. रिपोर्ट्सनुसार पुन्हा एकदा एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत यांचा ड्रग्स प्रकरणी एक मोठा खुलासा केला आहे.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीला त्यांच्या चौकशीत आढळून आलं आहे की रिया आणि सुशांतने लॉकडाऊन दरम्यान जवळपास अर्धा किलो मारिजुआना (गांजा) रियाच्या घरी मागवला होता. ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा लॉकडाऊनमध्ये सुशांत रियाच्या घरी काही वेळ घालवू इच्छित होता. यादरम्यान सुशांतच्या घरातून रियाच्या घरी मारिजुआनाचं एक कुरिअर पाठवलं गेलं होतं. 

सुत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीला तपासात असं दिसून आलं आहे की सुशांतच्या घरातून दीपेश सावंतने एक कुरिअर कुरिअर बॉयला दिलं होतं. हे कुरिअर रिया चक्रवर्तीच्या घरी तिचा भाऊ शौविकने घेतलं होतं. या कुरिअरमध्ये अर्धा किलो मारिजुआना (गांजा) होता. मारिजुआनाचं कुरिअर पकडलं जाऊ नये यासाठी त्या कुरिअरच्या पॅकेटमध्ये घरातील काही सामान देखील पॅक केलं होतं. हे कुरिअर एप्रिल महिन्याच्या मधल्या काही दिवसांमध्ये पाठवलं गेलं होतं. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुरिअर बॉयने सुशांतचा हेल्पर दिपेश सावंत आणि रियाचा भाऊ शौविकला ओळखलं आहे. इतकंच नाही तर कुरिअर बॉयचे फोन डिटेल्स देखील शौविक आणि दिपेशसोबत मॅच झाले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, सुशांत लॉकडाऊन दरम्यान रियाच्या घरी जाणार होता. त्यामुळे तिथे मारिजुआनाचं कुरिअर पाठवलं गेलं होतं. सध्या एनसीबी याप्रकरणाचा कसून तपास करत आहे.  

sushant and rhea couriered a packet of marijuana to the actress home during lockdown found ncb     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com