सुशांतने बँकॉक ट्रीपमध्ये खास सारा अली खानसाठी बुक केलं होतं चार्टर्ड विमान

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 1 September 2020

सीबीआय या केसमध्ये सुशांतशी संबंधित अनेक लोकांनी चौकशी करत आहे मात्र यात काही लोक नवीन खुलासे करत आहेत. याच्याशीच संबधित गेल्या काही दिवसांपासून सुशांतची बँकॉक ट्रीप चर्चेचा विषय बनली आहे.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. यादरम्यान सुशांतविषयी अनेक जुन्या आठवणी ताज्या होताना दिसत आहेत. सीबीआय या केसमध्ये सुशांतशी संबंधित अनेक लोकांनी चौकशी करत आहे मात्र यात काही लोक नवीन खुलासे करत आहेत. याच्याशीच संबधित गेल्या काही दिवसांपासून सुशांतची बँकॉक ट्रीप चर्चेचा विषय बनली आहे.

हे ही वाचा: सुशांतच्या चॅटमधून खुलासा- बहीण प्रियांका देत होती एंजायटी-डिप्रेशनची औषधं घेण्याचा सल्ला

सुशांतचा माजी असिस्टंट साबिर अहमदने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतच्या बँकॉक ट्रीपचा उल्लेख केला होता. रियाने या ट्रीपबद्दल सांगताना म्हटलं होतं की सुशांतचे केवळ मित्रच या ट्रीपमध्ये होते. मात्र साबिरने ही गोष्ट चूकीची असल्याचा दावा करत म्हटलं होतं की या ट्रीपमध्ये सुशांतच्या मित्रांव्यतिरिक्त अभिनेत्री सारा अली खान देखील होती. आता तर यात आणखी एक बाब समोर येत आहे. 

या ट्रीपबाबत असं म्हटलं जातं की सुशांतने त्याच्या मित्रांवर ७० लाख रुपये खर्च केले होते. मात्र आता हे समोर येत आहे की सुशांतने सारा अली खानसाठी ही ट्रीप आयोजित केली होती. या ट्रीपसाठी सुशांतने चार्टर्ड विमान केवळ सारा अली खानसाठी बुक केलं होतं जेणेकरुन हे दोघं एकमेकांना पसंत करत आहेत ही गोष्ट समोर येऊ नये. रिपोर्ट्सनुसार सारा अली खानला एअरपोर्टवर सुशांतचा मित्र सॅम्युअल होकिपने रिसीव केलं होतं.

या ट्रीपमध्ये सुशांत आणि सारा एका आलिशान हॉटेलमध्ये राहिले होते. या ट्रीप दरम्यान सुशांत आणि सारा केवळ पहिल्याच दिवशी बीचवर गेले होते. बाकीच्या दिवसात सुशांतचे इतर मित्र फिरायला जात मात्र सारा आणि सुशांत हॉटेलमध्येच थांबत असल्याचं माहिती समोर येत आहे.    

sushant booked a chartered plane during the bangkok trip only for sara ali khan  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant booked a chartered plane during the bangkok trip only for sara ali khan