रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीने सुशांतला ड्रग देत असल्याचं केलं कबुल, वाचा चौकशीत काय म्हणाला?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 10 September 2020

रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा कबुलीजबाब समोर आला आहे ज्यामध्ये त्याने ड्रग्स खरेदी केले असल्याचं कबुल केलं आहे. शौविकने हे मान्य केलं आहे की तो सुशांतच्या घरी ड्रग्स पोहोचवत होता. 

मुंबई- सुशांत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनच्या कारणामुळे रिया चक्रवर्ती आणि इतर आरोपींच्या जामीनावर कोर्टाने शुक्रवारी सुनावणी करणार असल्याचं सांगितल्याने आता आणखी एक दिवस रिया आणि इतर आरोपींना तुरुंगात राहावं लागणार आहे.  या दरम्यान रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा कबुलीजबाब समोर आला आहे ज्यामध्ये त्याने ड्रग्स खरेदी केले असल्याचं कबुल केलं आहे. शौविकने हे मान्य केलं आहे की तो सुशांतच्या घरी ड्रग्स पोहोचवत होता. 

हे ही वाचा: बिग बी, थलायवानंतर आता सनी लिओनीच्या आलिशान कारची चर्चा  

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, त्यांच्या हाती जो कबुलीजबाब लागला आहे त्यात शौविकने म्हटलंय की '१६ मार्चला रिया चक्रवर्तीने मला मेसेज केला होता आणि सांगितलं होतं की सुशांतला मारिजुआना आणि हॅशची गरज आहे. सुशांत दिवसातून कमीत कमी ४ ते ५ वेळा मारिजुआना घ्यायचा आणि यामुळेच मी म्हटलं की मी ५ ग्रॅम बड म्हणजेच क्युरेटेड मारिजुआनाची व्यवस्था करतो ज्यामुळे २० वेळा धुम्रपान केलं जाऊ शकतं.'

शौविकने एनसीबीला दिलेल्या जबाबात सांगितलं की, 'मी बडसाठी माझा एक मित्र अब्दुल बासित परिहारला संपर्क केला आणि मग नंतर रिया आणि सॅम्युअलला बडच्या किंमतीची माहिती दिली कारण सॅम्युअल मिरांडा सुशांतच्या घरचा मॅनेजर होता. मग सॅम्युअलने बासित परिहारशी संपर्क केला. बासितने जैदचा नंबर दिला आणि दुस-या दिवशी म्हणजेच १७ मार्चला बड पोहोचवलं गेलं.'

शौविक म्हणाला की, 'मला आठवतंय १५ एप्रिलला सॅम्युअल मिरांडाने मला व्हॉट्सअपद्वारे संपर्क केला आणि सुशांतसाठी ड्रग्सचा पुरवठा करण्यास सांगितलं आणि म्हणूनंच दिपेश सावंतने देखील माझ्याशी संपर्क केला. मी माझी बहीण रियासोबत देखील याबाबतीत चर्चा केली. ड्रगसाठी मी पुन्हा बासितला संपर्क केला.'शौविकने पुढे म्हणाला, 'बासितने मला सांगितलं की तो त्याच्या एका मित्राकडून हॅश उपलब्ध करुन देऊ शकतो कारण कोरोनामुळे लॉकडाऊन आहे आणि पुरवठा देखील कमी आहे. माझ्या विनंतीनंतर बासितने कैजान नावाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून दिपेश सावंतला ड्रग्स दिले. नंतर बासितने मला हे सांगितलं.'

शौविकने सुशांतसोबतच्या त्याच्या नात्याबाबत एनसीबीला माहिती दिली. त्याने सांगितलं की कशाप्रकारे सुशांतसोबत भेट झाली आणि त्याने कित्येकदा सुशांतसाठी ड्रग्सची व्यवस्था केली. मात्र शौविकने हे देखील स्पष्ट केलं की त्याने त्याच्या मित्रांच्या माध्यमातून ड्र्ग्सची व्यवस्था केली होती.   

sushant case rhea chakraborty drug connection showik chakraborty ncb inquiry  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant case rhea chakraborty drug connection showik chakraborty ncb inquiry