सिद्धार्थ पिठानी म्हणाला, 'कुटुंबियांच्या परवानगीने उतरवला होता मृतदेह', सुशांंतच्या कुटुंबियांनी नाकारली गोष्ट

siddharth pithani on sushant
siddharth pithani on sushant
Updated on

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या  प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. सीबीआयने या प्रकरणात असलेल्या संशयितांची सगळ्यात पहिले चौकशी केली आहे. सुशांतचा जवळचा मित्र आणि त्याचा रुममेट सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज आणि मदतनीस दीपेश यांची सीबीआय चौकशी करत आहेत. ज्यामध्ये अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत.

मिडिया रिपोर्ट्सनुसार सीबीआयचे सिद्धार्थ पिठीनीच्या केलेल्या चौकशीत अनेक मुद्दे समोर आले आहेत. त्याने सांगितलं की सुशांतचा लटकलेला मृतदेह त्यानेच खाली बेडवर उतरवला. सिद्धार्थने हे देखील सांगितलं की सुशांतच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरुनंच मी त्याचा मृतदेह उतरवला. मात्र ही गोष्ट सुशांतच्या कुटुंबियांनी नाकारली आहे. सिद्धार्थच्या या जबाबावर सुशांतच्या घरातील एका सदस्याने म्हटलं आहे की 'सिद्धार्थ खोटं बोलत आहे. खरं हे आहे की कोविड-१९ च्या संकटामुळे कुटुंबातील सदस्य १४ जून रोजी संध्याकाळी दिल्लीतून मुंबईला पोहोचला होते. तोपर्यंत सुशांतचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता.'

कुटुंबातील या सदस्याने असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे की 'सगळेजण घरात असताना त्यादिवशी चावी कशी काय हरवली होती? चावी वाल्याला बोलवलं मात्र त्याला आत जाऊन दिलं नाही. तसंच सुशांतचा मृतदेह १४ जून रोजी दुपारीच पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला होता मात्र रात्री उशीरा ११ नंतर त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं.' 

सुशांत मृत्यु प्रकरणात सीबीआय प्रत्येकदिवशी पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या पाच दिवसात सीबीआयने सगळ्या संशयितांची चौकशी केली आहे. ज्यामध्ये अनेक मोठे खुलासे झाले आहे. इथपर्यंत की  सीबीआयने मुंबई पोलिस अधिका-याची देखील चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी दोन पोलिस अधिका-यांना समन्स पाठवले आहेत.    

sushant death case as per media reports late actor family denied siddharth pithani statement  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com