
मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात नवीन वळण आलं आहे. या प्रकरणात आता अशी गोष्ट समोर आली आहे जी या तपासात महत्वाचा महत्वाचा पुरावा बनू शकते. रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअप चॅटमधून ड्रगचा कट असण्याची शक्यता आणखीनंच बळावली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टमधून सुशांतच्या नारकोटीक्स लिंक झाल्याची गोष्ट समोर येत आहे. चॅटमधील काही गोष्ट आता समोर आल्या आहेत. असं म्हटलं जातंय की हे रिट्रीव चॅट्स आहेत जे रियाने पहिल डिलीट केले होते. पहिलं चॅट रिया आणि गौरव आर्यामधील आहे. गौरव आर्या म्हणजे तीच व्यक्ती आहे जी ड्रग डीलर असल्याचं म्हटलं जातंय. या चॅटमध्ये लिहिलंय, 'हार्ड ड्रग्स बद्दल बोलायचं झालं तर मी कधी त्याचा वापर केला नाहीये.' हा मेसेज रियाने ८ मार्च २०१७ ला रियाने गौरवला पाठवला होता.
दुसरं चॅट देखील रिया आणि गौरव मधील आहे. यामध्ये रियाने गौरवला विचारलं आहे की 'तुझ्याकडे MD आहे का?' इथे MD चा अर्थ MDMA असा आहे म्हणजेच Methylenedioxymethamphetamine. हा एक प्रकारचा ड्रग आहे जो खूप स्ट्राँग असल्याचं म्हटलं जातं.
तिसरं चॅट रियाने जया साहासोबत केलं आहे. हे चॅट २५ नोव्हेंबर २०१९ मधील आहे. यामध्ये रिया जयाला सांगते की, 'मी त्याला श्रुतीसोबत को-ओर्डिनेट करायला सांगितलं आहे.' त्यानंतरच्या चौथ्या चॅटमध्ये रिया जयाला 'धन्यवाद' म्हणते. यावर जयाने रियाला रिप्लाय करत म्हटलं आहे, 'नो प्रॉब्लेम ब्रो, आशा आहे की याची मदत होईल.' पाचवं चॅटदेखील २५ नोव्हेंबर २०१९चं आहे. या चॅटमध्ये जया रिया चक्रवर्तीला सांगते, 'चहा, कॉफी किंवा पाण्यात ४ थेंब टाक आणि ते प्यायला दे. याचा परिणाम पाहण्यासाठी ३० ते ४० मिनिटे वाट बघ.'
यानंतरचं चॅट रियाने मिरांडासोबत केलं आहे. यामध्ये मिरांडा सांगतो, 'हाय रिया, जवळपास संपलं आहे.' हे चॅट एप्रिल २०२० मधील आहे. आणखी एका चॅटमध्ये मिरांडा रियाला विचारतो, 'हे आपण शौविकच्या मित्राकडून घेऊ शकतो का? मात्र त्याच्याकडे केवळ hash आणि bud आहेत.' इथे ज्या hash आणि bud चा उल्लेख केला आहे त्याला कमी दर्जाचे ड्रग्स मानलं जातं. हे चॅट देखील एप्रिल २०२० चं आहे.
याबाबतीत वृत्तवाहिनीने गौरवशी संपर्क केला असतो तो म्हणाला की 'मी ड्रग्स घेत नाही. जो दावा केला जातोय त्याबद्दल मला काहीच कल्पना नाही.' तर दुसरीकडे यावर रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी देखील म्हटलंय की 'रियाने कधीच ड्रग्स घेतलेले नाहीत, ती केव्हाही ब्लड टेस्ट करण्यासाठी तयारी आहे.'
whatsapp chat of rhea chakraborty reveals drug angle conspiracy in sushant singh rajput case
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.