esakal | सुशांतच्या पर्सनल नोट्समध्ये क्रितीचं नाव, 'सोबत वेळ घालवायचा आहे'
sakal

बोलून बातमी शोधा

sushant kriti

सुशांत सिंह राजपूतच्या सिक्रेट्स नोट्स त्यांच्या हाती लागल्या आहेत ज्या सुशांतने २०१८ मध्ये लिहिल्या होत्या. एप्रिल २०१८च्या या नोट्समध्ये सुशांतच्या आयुष्यातील ते सिक्रेट्स आहेत जे कित्येक गोष्टींचा पडदा फार्श करु शकतात.

सुशांतच्या पर्सनल नोट्समध्ये क्रितीचं नाव, 'सोबत वेळ घालवायचा आहे'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला तीन महिने होऊन गेले आहेत. या प्रकरणाचा तपास अजुनही मोठ्या एंजसी करत आहेत. मात्र तरीही या प्रकरणात अशी काही वळणं येत आहेत ज्यामुळे यातील अनेक समीकरणं बदलत आहेत.

हे ही वाचा:  बॅटमिंटन खेळताना आला हार्ट ऍटॅक, अभिनेत्याचं वयाच्या ४३ व्या वर्षी निधन  

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत सिंह राजपूतच्या सिक्रेट्स नोट्स त्यांच्या हाती लागल्या आहेत ज्या सुशांतने २०१८ मध्ये लिहिल्या होत्या. एप्रिल २०१८च्या या नोट्समध्ये सुशांतच्या आयुष्यातील ते सिक्रेट्स आहेत जे कित्येक गोष्टींचा पडदा फार्श करु शकतात. एप्रिल २०१८ च्या वेळी सुशांतच्या आयुष्यात रिया चक्रवर्तीची एंट्री झाली नव्हती. त्यामुळेच रिया त्याच्या आयुष्यात येण्याआधी त्याचं आयुष्य कसं होतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं.

नोट्समध्ये लिहिलं आहे की सुशांतला स्मोकिंग सोडायची होती. त्याला त्याचा सिनेमा 'केदारनाथ'ची स्क्रीप्ट वाचायची होती. मात्र सगळ्यात जास्त हैराण करणारी गोष्टी म्हणजे त्याच्या या नोट्समध्ये क्रिती सॅननचा उल्लेख असल्याचं म्हटलं जातंय.या नोट्समध्ये केवळ क्रिती असं लिहिलेलं आहे. मात्र असं म्हटलं जातंय की तो अभिनेत्री क्रिती सॅननविषयीच म्हणत होता. क्रिती सॅनने सुशांतसोबत २०१७मध्ये 'राबता' सिनेमात काम केलं होतं. सिनेमा फ्लॉप झाला. मात्र दोघांमधील मैत्रीच्या खूप चर्चा होत्या. त्यांची मैत्री एवढी चांगली झाली होती की ते एकमेकांना डेट करत असल्याचं देखील म्हटलं गेलं.

सगळेकडे सोबत जाणं, सिनेमा पाहणं, पार्टीमध्ये एकत्र दिसणं, एकमेकांसोबत येणं जाणं सुरु असायचं. या कारणामुळेच दोघांच्या नात्याविषयी अनेक अंदाज बांधले गेले. क्रिती आणि सुशांत दोघेही इंजीनिअर बॅग्राउंडचे. दोघांचं एकमेकांसोबत चांगलं पटत होतं. एका मुलाखतीत क्रितीने सुशांतला पसंत करत असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी तिने त्याला चांगला मित्र म्हटलं होतं.   

sushant secret notes kriti sanon connection