रक्षाबंधनादिवशी सुशांतची बहिण भावूक, शेअर केला 'हा' फोटो

रक्षाबंधनादिवशी सुशांतची बहिण भावूक, शेअर केला 'हा' फोटो

मुंबई: आज रक्षाबंधनानिमित्त अनेक सेलिब्रिटी आपल्या बहीण- भावासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताहेत. तसाच एक सुशांतसोबतचा जुना फोटो त्यांची बहीण श्वेतासिंग कीर्ती हिने शेअर केला आहे. या फोटोसोबत श्वेतानं भावनिक पोस्ट लिहीत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. 

तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 35 वर्षांनंतर आजही सगळं तसंच आहे, फक्त आज तू नाहीस. माझं बाळ. आज माझा दिवस आहे. आज तुझा दिवस आहे. आज आपला दिवस आहे. आज रक्षाबंधन आहे. 35 वर्षानंतर हा पहिला असा दिवस आहे, जेव्हा आरतीचं ताट सजलं आहे, औक्षणाकरता दिवा लावला आहे. हळद- चंदनाचं गंध आहे आणि गोड पदार्थसुद्धा आहेत. 

आज रक्षाबंधन आहे. पण आज तो चेहरा नाही ज्याला मी औक्षण करु शकते. तो हात नाही ज्याच्या मनगटावर मी राखी बांधू शकते. ते ओठ नाहीत ज्यांना मी गोड पदार्थ भरवू शकते. तो भाऊ नाही ज्याला मी मिठी मारू शकते. तुझा जन्म झाल्यानंतर आमचं सगळं जीवन आनंदाने भरून गेलं होतं. सगळीकडे आनंदीआनंद होता. पण आता तू नाहीस तर सुचत नाही. मी काय करू. तुझ्याशिवाय जगणं अशक्य आहे. कधीच वाटलं नव्हतं असाही दिवस पाहावा लागेल. रक्षाबंधन असेल. पण तू नसशील हा विचारच करवत नाही. तुझ्यासोबत अनेक गोष्टी शिकल्या मग आता तुझ्याशिवाय जगायचं कसं शिकू? तूच सांग.

या पोस्टसोबत श्वेतानं काही वर्षांपूर्वीचे त्यांचे रक्षाबंधनाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्या सगळ्या बहिणी मिळून सुशांतला राखी बांधत आहेत. 

सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  यामध्येच आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुशांतच्या बहिणीने ही भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सुशांतच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर कोसळलेलं दु:ख या पोस्टमधून दिसून येते.

(संपादनः पूजा विचारे)

Sushant Singh Rajput’s sister Shweta Singh Kirti shares throwback collage childhood memories Raksha Bandhan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com