सुशांत सिंग राजपुत-अंकिता लोखंडे ही प्रसिद्ध जोडी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

मुंबई- लॉकडाऊनमध्ये अनेक मालिकाचं पुनःप्रक्षेपण प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुरु करण्यात आलं आहे. यात हिंदी मराठीमध्ये गाजलेल्या अनेक मालिका आहेत. महाभारत आणि रामायण नंतर अनेक मालिकांनी हा निर्णय घेतला. यातंच आता भर पडली आहे ती एका प्रसिद्ध हिंदी मालिकेची. होय सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. टीव्ही मालिका पवित्र रिश्ता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हे ही वाचा: विश्वसुंदरी बनल्यानंतर जेव्हा ऐश्वर्या जमिनीवर बसून जेवली होती. 

'पवित्र रिश्ता' या सुपरहिट मालिकेचा सिक्वेल वगैरे येत असेल असा जर तुम्ही अंदाज बांधत असाल तर तसं काही नाहीये. लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी प्रेक्षकांची आवडती मालिका पुनःप्रसारित करण्याचा निर्णय वाहीनीने घेतला आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यातंच प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी कथा असल्याने प्रेक्षकांचा चांगला कनेक्ट होता.

या मालिकेदरम्यान दोघेही ख-या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. या दोघांच्या केमिस्ट्रीने पवित्र रिश्ता ही मालिका प्रेक्षकांनी उचलून धरली होती.या मालिकेनंतर सुशांत सिनेमा करण्यामध्ये व्यस्त झाला तर अंकिताने देखील मालिकांपासून ब्रेक घेत कालांतराने सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. आज दोघेही यशाच्या शिखरावर आहेत मात्र त्यांच्या करिअरसाठीही ही मालिका महत्वाची ठरली होती.

या मालिकेने त्यांचा चेहरा घराघरात पोहोचला. त्यामुळे आता या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा हे दोघेही या मालिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहेत. पवित्र रिश्ता ही मालिका सोमवार ते शुक्रवार दुपारी ३ वाजता झी टीव्हीवर पुनःप्रक्षेपित केली जाणार आहे.  

sushant singh rajput and ankita lokhande show pavitra rishta will be shown once again  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput and ankita lokhande show pavitra rishta will be shown once again