सुशांतच्या सीएचा दावा- '१५ कोटींचा व्यवहार अकाऊंटमधून झाला नाही'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
शुक्रवार, 31 जुलै 2020

सुशांतच्या वडिलांनी आरोप केला होता की त्याच्या अकाऊंटमधून जवळपास १५ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.मात्र सुशांतच्या सीएचं म्हणणं आहे की सुशांतच्या अकाऊंटमधून जास्त व्यवहार झालेला नाही.

मुंबई- सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवीनंच खुलासे होत आहेत. सुशांतच्या वडिलांनी आरोप केला होता की त्याच्या अकाऊंटमधून जवळपास १५ कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.मात्र सुशांतच्या सीएचं म्हणणं आहे की सुशांतच्या अकाऊंटमधून जास्त व्यवहार झालेला नाही. उलट त्याच्या अकाऊंटमध्ये जास्त पैसेच नव्हते.

हे ही वाचा:  'सुशांत नैराश्यात होता हे बोलणं बंद करा', अंकिता लोखंडेने सुशांतच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच केले 'हे' मोठे खुलासे  

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं होतं की त्याच्या अकाऊंटमधून १५ कोटीचा मोठा व्यवहार झाला आहे. मात्र एका वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टनुसार सीए संदीप श्रीधरचं म्हणणं आहे की सुशांतच्या अकाऊंटमध्ये जास्त पैसैच नव्हते. त्यांनी सांगितलं की रियाच्या अकाऊंटमध्ये हजार रुपये पाठवले होते. आणि रियाच्या आईने ३३ हजार रुपये पाठवले होते. याव्यतिरिक्त कोणताच मोठा व्यवहार झालेला नाही. 

संदीप यांनी सांगितलं की सुशांत त्याच्या जीवनशैलीच्या हिशोबाने खर्च करत होता. तो अभिनेता असल्याने भाडं, प्रवास आणि शॉपिंगवरंच खर्च व्हायचा. संदीप यांनी सांगितलं की गेल्या वर्षी त्याच्या कमाईमध्ये घट झाली होती. त्याच्या अकाऊंटमध्ये एवढे पैसेच नव्हते जेवढे एफआयआरमध्ये सांगितले गेले आहेत. त्याचे ऑनलाईन व्यवहार दिसून येत नाहीयेत. आणि रियाच्या कुटुंबाला सरळ पद्धतीने कोणतीच रक्कम दिली गेली नाहीये.

सुशांतच्या सीएने सांगितलेला हिशोब-

२०१९ पासून ते जून २०२० पर्यंतचा हिशोब सीए संदीप यांनी मांडला आहे.

२ कोटी रुपये कोटक महिंद्राचं डिपॉझिट, ३ लाख ८७ हजार रुपये भाडं, ६१ लाख रुपये KWA ला दिले, २६ लाख ४० हजार रुपये त्याच्या फार्महाऊसचं भाडं, ४ लाख ८७ हजार रुपये प्रवास, ५० लाख परदेशी टूर, अडीच कोटी रुपये आसाम ते केरळ टूर, ९ लाख रुपये डोनेशन.  

sushant singh rajput ca sandeep sridhar gives details of his transactions  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput ca sandeep sridhar gives details of his transactions