'सुशांत नैराश्यात होता हे बोलणं बंद करा', अंकिता लोखंडेने सुशांतच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच केले 'हे' मोठे खुलासे

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
शुक्रवार, 31 जुलै 2020

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर आलं होतं की तो नैराश्याने ग्रासला होता आणि त्यावर त्याचे उपचारही सुरु होते. मात्र या सगळ्यावर आता त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने मौन सोडलं आहे.

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर जवळपास दीड महिन्यांनी त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे या प्रकरणावर बोलती झाली आहे. अंकिताचं म्हणणं आहे की सुशांत एक आनंदी व्यक्ती होती. तो हिरो होता. तो एखाद्या गोष्टीमुळे नाराज होऊ शकतो पण नैराश्यात जाऊ शकत नाही. अंकिता पहिल्यांदाच सुशांत प्रकरणात बोलती झाली आहे. तिने या मुलाखतीत अनेक मोठे खुलासे देखील केले आहेत.

हे ही वाचा: कतरिना कैफचा हा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर आलं होतं की तो नैराश्याने ग्रासला होता आणि त्यावर त्याचे उपचारही सुरु होते. इतकंच नाही तर तो बायपोलर होता असंही म्हटलं जात होतं. मात्र या सगळ्यावर आता त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने मौन सोडलं आहे. एका प्रसिद्ध वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले आहेत. अंकिता म्हणाली की 'सुशांतच्या मृत्यनंतर लगेचच १५ मिनिटामध्ये अशा बातम्या येऊ लागल्या की त्याने आत्महत्या केली. तो नैराश्यात होता. मला जेव्हा त्याच्या मृत्युबद्दल कळालं तेव्हा ते स्विकारायला मला खूप वेळ लागला. जो आत्महत्या करणा-या मुलांपैकी नव्हताच.'

अंकिता पुढे सांगते की, 'मी सुशांत सारखा मुलगा माझ्या आयुष्यात पाहिलाच नाही. तो डायरी लिहायचा. त्यात त्याची ५ वर्षांची स्वप्न देखील लिहीली होती. आणि बरोबर पाच वर्षांनी त्याने त्याची सगळी स्वप्न पूर्ण केली होती. तो सतत आनंदी राहणारा मुलगा होता. तो असा व्यक्ती नव्हता जो अडचणी आल्यावर आत्महत्या करेल. मला खरंच माहित नाही परिस्थिती नेमकी काय होती. आम्ही सात वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो त्यामुळे मी आणि सुशांतने यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती पाहिली आहे आणि त्यातून बाहेर देखील आलो आहोत. तो नाराज होऊ शकतो मात्र नैराश्यात जाऊ शकत नाही. भिती सगळ्यांनाच असते मात्र मी खात्रीने सांगू शकते की सुशांत नैराश्यात नव्हता.'

अंकिताने हे ही सांगितलं की, 'एक नैराश्यात असलेला व्यक्ती म्हणून न पाहता लोकांच्या आठवणीत तो हिरो म्हणून राहिला पाहिजे. लोकं स्वतःचीच वेगवेगळी कहाणी रंगवत आहेत कि तो असा होता, तसा होता. कोणाला माहित तरी आहे का की सुशांत कसा होता? तो एका लहानमुलासारखा होता जो जेवण पाहून खुश व्हायचा. गुलाबजाम पाहून आनंदी व्हायचा.लोकं त्याला बायपोलर म्हणत आहेत. त्यांना माहित तरी आहे की या सगळ्या किती मोठ्या गोष्टी आहेत.  सुशांतकडे एक प्रेरणास्त्रोत म्हणून पाहावं असं मला वाटतं. एका छोट्या शहरातून आलेला मुलगा ज्याने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक जागा निर्माण केली.'

बिहार पोलिसांनी अंकिता लोखंडेचा जबाब अधिकृतरित्या देखील नोंदवला आहे.  

sushants ex girlfriend ankita lokhande says the actor can not be in depression at all 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushants ex girlfriend ankita lokhande says the actor can not be in depression at all