सुप्रिया पिळगावकरांनी १९९५ मध्येच दाखवलं होतं मास्क कसा घालावा, मुलगी श्रियाने केला गमतीशीर व्हिडिओ शेअर

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
शुक्रवार, 31 जुलै 2020

९०च्या दशकातंच एका अभिनेत्रीने मास्क कसा वापरावा हे थेट तिच्या शोमधूनंच दाखवून दिलेलं. होय अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि रिमा लागू यांचा एक मास्क व्हिडिओ व्हायरल होतोय.

मुंबई- कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात मास्क वापरणं ही काळाची गरज झाली आहे. मात्र या चार महिन्यात ही काळाजी गरज न राहता एक ट्रेंड झालेलाच पाहायला मिळतोय. आता तर लोक वेगवेगळ्या प्रकारचे मास्क वापरताना पाहायला मिळत आहेत. काही जण तर पेहरावाशी मॅचिंग असे मास्क वापरात आणत आहेत. पण हे सगळं सुरु होण्याआधी सामान्य लोकांना मास्क कसा वापरावा तो कसा बांधावा याविषयी फार माहिती नव्हती. डॉक्टरांव्यतिरिक्त कोणीच मास्कचा वापर करताना याआधी दिसलं नव्हतं. पण तुम्हाला माहित आहे का की ९०च्या दशकातंच एका अभिनेत्रीने मास्क कसा वापरावा हे थेट तिच्या शोमधूनंच दाखवून दिलेलं. होय अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि रिमा लागू यांचा एक मास्क व्हिडिओ नुकताच व्हायरल होतोय.

बर्थडे स्पेशलः मुमताजच्या लग्नाची बातमी ऐकून राजेश खन्ना झाले होते नाराज

सध्याच्या न्यू नॉर्मल काळात मास्क हा वापरायलाच हवा आहे आणि म्हणूनंच याची सवय करुन घेणं गरजेचं आहे. यासाठी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिची आई आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि दिवंगत अभिनेत्री रिमा लागू या मास्क कशा प्रकारे वापरत आहेत हे दाखवलं आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिलंय, 'हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना मास्क व्यवस्थित कसा घालावा हे माहित नाही. ही व्हिडिओ क्लीप १९९५ मधील 'तु तु मै मै' या प्रसिद्ध कार्यक्रमातील आहे जी मास्क कसा घालावा यासाठी एक उत्तम प्रशिक्षण आहे असं मला वाटतं.'श्रिया पुढे लिहिते की, 'या शो ला आजही कित्येक पिढ्यांच प्रेम मिळत गेलं आहे हे खरंच अभूतपूर्व आहे. वडिलांनी दिग्दर्शित केलेला हा सास बहु ड्रामा. रिमा मावशी आणि सुप्रिया पिळगावकर.'

यासोबतंच श्रियाने विशेष टिप्पणी  असं म्हणत एक गमतीशीर गोष्ट देखील सांगितली आहे. तिने लिहिलंय, 'माझ्या वडिलांनी मला यात कॅमिओ करायला लावला होता बिट्टू नावाचा ते पण शेजा-याचा मुलगा म्हणून.' 

supriya pilgaonkar and reema lagoo wore face mask in tu tu main main back in the 90s watch video  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya pilgaonkar and reema lagoo wore face mask in tu tu main main back in the 90s watch video