
सुशांतचा त्याच्या कुत्र्यावर खूप जीव होता. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या कुत्र्यासोबत डान्स करताना दिसतोय.
मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यापैकी अनेक व्हिडिओमध्ये हसतमुख असलेला आणि मस्ती करणारा, आयुष्यावर प्रेम करणारा सुशांत पाहायला मिळतोय. सुशांतला त्याच्या याच अंदाजामुळे चाहत्यांना त्याची आठवण येत आहे आणि ते त्याला मिस करत आहेत. सुशांतचा त्याच्या कुत्र्यावर खूप जीव होता. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या कुत्र्यासोबत डान्स करताना दिसतोय.
हे ही वाचा: न्युझीलँडमध्ये थिएटर झाले खुले,अजय देवगणचा 'हा' सिनेमा झाला सगळ्यात पहिले रिलीज
सुशांत सिंहने १४ जुनला आत्महत्या केली. त्याचे मित्र, नातेवाईक आणि चाहते या गोष्टीला स्विकारंच करु शकत नाहीयेत. सुशांतच्या निधनानंतर त्याचा कुत्रा फजचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते. या व्हिडिओंमध्ये फज सुशांतच्या फोटोकडे पाहून उदास बसला होता. आणि सुशांतच्या आठवणींमध्ये त्याने खाणं पिणंही सोडून दिलं होतं.
या व्हिडिओनंतर आता पुन्हा एकदा फज आणि सुशांतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या घरात टीव्हीवर गोविंदाच्या हिरो नंबर वन सिनेमाचं टायटल साँग बघत होता. थोड्याच वेळात उठुन तो नाचायला लागतो. एवढंच नाही तर त्याचा कुत्रा देखील सुशांत नाचायला लागल्याने आनंदाने उड्या मारायला लागला.
"main kaisa bhi rahoon woh mujhe hamesha ek jaisa hi treat karta hai toh woh foreverness ki jo feeling hai woh aati hai"
Sushant & Fudge dancing on Main Tera Hero No 1,their bond was something else pic.twitter.com/jWRdJe6feZ
— siddhant. (@ignoreandfly) June 23, 2020
सुशांतचे अनेक चाहते सोशल मिडियावर जुने व्हिडिओ शेअर करत त्याच्या आठवणी ताज्या करत आहेत. त्याचा शेवटचा सिनेमा छिछौरे होता ज्यात जीवनात कधी हार मारु नये असा सोशल मेसेज देण्यात आला होता. याशिवाय काय पो छे, एम.एस.धोनी सारखे कित्येक चांगले सिनेमे प्रेक्षकांना देऊन गेला. सुशांतने आत्महत्या का केली याचं कारण अजुनही समजू शकलेलं नाही. पोलिस या प्रकरणाचा सगळ्या बाजूने कसून तपास करत आहेत.
sushant singh rajput dancing with dog fudge on hero no 1 title song video viral