'सुशांत सर आजारी असायचे आणि रिया मॅडम पार्टी करायच्या'- सुशांतच्या बॉडीगार्डचा खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

सुशांत प्रकरणात अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले जात आहेत. . याचदरम्यान आता सुशांतच्या बॉडीगार्डनेही धक्कादायक खुलासा केला आहे.

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रकरणात अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले जात आहेत. सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर रिया यात फसत चालली आहे. याचदरम्यान आता सुशांतच्या बॉडीगार्डनेही धक्कादायक खुलासा केला आहे.

हे ही वाचा: सुशांत आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया तसंच महाराष्ट्र सरकारनेही सुप्रिम कोर्टात दाखल केली कैविएट

एका प्रसिद्ध वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतच्या बॉडीगार्डने सांगितलं की, 'सुशांतच्या घरी नेहमी पार्ट्या व्हायच्या ज्यात तो स्वतः सामील नसायचा. घरात देखील अनेक वायफळ खर्च व्हायचा ज्याचा सुशांतशी काही संबंध नसायचा. सुशांत सर नेहमी आजारी असायचे आणि त्यांच्या रुममध्ये झोपून राहायचे. मात्र याऊलट ते आजारी असताना देखील त्यांच्या घराच्या टेरेसवर पार्ट्या चालायच्या. या पार्ट्यांमध्ये रिया चक्रवर्ती, तिचे वडिल, तिची आई, तिचा भाऊ आणि काही मित्रमंडळी असायची.'

सुशांतच्या बॉडीगार्डने रिया चक्रवर्तीवर आरोप करत म्हटलं आहे की, 'या प्रकरणाचा योग्य तपास झाला पाहिजे आणि सुशांत सरांना न्याय मिळाला पाहिजे. रियाला भेटल्यानंतर सुशांत यांच्या वागण्यात खूप बदल झाला होता. त्यांचा जो काही आधीचा स्टाफ होता त्या सगळ्यांना काढून टाकलेलं. जुन्या स्टाफपैकी केवळ मीच एकटा राहिलो होतो. सुशांतच्या घरी केवळ रिया चक्रवर्तीच्याच कुटुंबातील लोकांचं येणं जाणं असायचं. सुशांतच्या घरातले कधीच यायचे नाहीत. पैश्यांचा हिशोब देखील रियाच करत होती. अशातंच घरात जो काही खर्च व्हायचा तो सगळा सुशांत सरांच्या पैश्यांनी व्हायचा. सुशांत सरांचा स्वतः खर्च खूप कमी होता मात्र जर एका वर्षात १५ कोटी रुपये खर्च झाले असतील तर त्याचा तपास व्हायला हवा.'

सुशांतला औषधांचा ओव्हरडोस देण्याच्या प्रश्नावर बॉडीगार्ड म्हणाला, 'आम्ही जेव्हा पण त्यांना भेटायला जायचो तेव्हा आम्हाला सर झोपले आहेत असंच सांगितलं जायचं. पहिले तर सगळं व्यवस्थित होतं मात्र युरोप टूरनंतर त्यांची तब्येत खराब व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर ते सतत आजारीच असायचे.'  

sushant singh rajput death bodyguard opened up about late actor lifestyle and rhea chakraborty  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput death bodyguard opened up about late actor lifestyle and rhea chakraborty