
सुशांतचा जन्म खूप नवस केल्यानंतर झाला होता. ते सुशांतला गॉडगिफ्टंच मानायचे.
मुंबई- सुशांत सिंह राजपूत आता या जगात नाही मात्र त्याच्या आठवणी त्याच्या चाहत्यांसोबत कायम आहेत. सुशांतच्या मृत्युच्या धक्क्यातून अनेकजण अजून सावरलेले नाहीत. सुशांतचे वडिल केके सिंह हे देखील सुशांतच्या निधनाची बातमी ऐकून बेशुद्ध झाले होते. आता त्यांची तब्येत ठिक असून नुकतंच त्यांनी सुशांतशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या आहेत.
हे ही वाचा: अभिनंदन टीम इंडिया! कोणी केलंय भारतीय संघाचं अभिनंदन
सुशांतच्या वडिलांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की सुशांतचा जन्म खूप नवस केल्यानंतर झाला होता. ते सुशांतला गॉडगिफ्टंच मानायचे. त्यांनी सांगितलं की, खूप नवस बोलल्यानंतर सुशांतचा जन्म झाला होता. ३ वर्ष नवस करत होतो त्याच्यासाठी. ४ मुलींमध्ये तो एकटा मुलगा होता. आणि ज्याच्यासाठी आपण एवढे नवस मागतो त्यांच्यासोबत असंच होतं.
यापुढे जाऊन सुशांतच्या वडिलांनी आणखी एका गोष्टीचा खुलासा केला. २००२ मध्ये त्यांच्या पत्नीने या जगाचा निरोप घेतला तेव्हापासून सुशांत आध्यात्मिक झाला होता. सुशांतसोबत त्याच्या आईच्या आत्म्याचं कनेक्शन नेहमी राहिल. आणि माणसाला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा तो तेवढा प्रभावित राहत नाही. के के सिंह यांनी सांगितलं की सुशांतच्या निधनानंतर अनेक लोक आले जे माझ्यापेक्षाही जास्त भावनिक झाले होते.
सुशांतने त्याच्या त्रासाबद्दल तुम्हाला काही सांगितली की नाही या प्रश्वावर त्यांनी सांगितलं की, पहिले तो सगळं सांगायचा पण शेवटी काय झालं हे त्याने सांगितलं नाही. शेवटी हा नियतीचा खेळ आहे. जे लिहिलेलं असतं तेच होतं. आम्ही त्याला कधी सक्ती केली नाही आणि हाही विचार करुन चालत होतो की त्याला कोणत्याच गोष्टीचं प्रेशर देऊ नये.
sushant singh rajput father k k singh first reaction after his death