अभिनंदन टीम इंडिया..! कोणी केलंय भारतीय संघाचे अभिनंदन...

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 25 June 2020

भारताने विश्वचषक जिंकल्याला आज 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 जून 1983 या दिवशी भारताने क्रिकेटच्या विश्वात मोठी कामगिरी केली होती. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली विश्वचषक भारतात आणला होता.

मुंबई : भारताने विश्वचषक जिंकल्याला आज 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. 25 जून 1983 या दिवशी भारताने क्रिकेटच्या विश्वात मोठी कामगिरी केली होती. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली विश्वचषक भारतात आणला होता आणि त्यानंतर भव्य मिरवणूक आणि सत्कार समारंभ वगैरे झाले होते. याच ऐतिहासिक घटनेवर दिग्दर्शक कबीर खानने 83 हा चित्रपट साकारला आहे. 

नागरिकांनो सजग राहा.. सायबर गुन्हेगारीत वाढ; राज्यात 'इतके' गुन्हे दाखल...

83 हा चित्रपट तयार असून तो खरे तर एप्रिल महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन आता पुढे ढकलण्यात आले आहे. जेव्हा थिएटर्सचे पडदे उघडतील तेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होईल. पण आज या चित्रपटाच्या निर्मात्यांनी विश्वचषक जिंकणाऱ्या संपू्र्ण भारतीय टीमचे सोशल मीडियावर अभिनंदन केले आहे. 

धक्कादायक! परदेशांतून परतणाऱ्या भारतीय प्रवाशांची विमानतळावर लूट; वाचा कुणी केलाय हा आरोप...

दीपिका पदुकोन, फॅण्टम फिल्म, साजिद नाडियादवाला, रिलायन्स एन्टरटेन्मेंट हे या चित्रपटाचे निर्माते आहे. त्यांनी अभिनंदन करताना म्हटले आहे, की भारतीय क्रिकेट विश्वासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. अभिनंदन भारतीय टीम. या चित्रपटात कपिलदेवची भूमिका रणवीर सिंहने साकारली आहे. या चित्रपटाद्वारे दीपिका आणि रणबीर ही जोडी पुन्हा एकत्र येत आहे. रोमी भाटियाची भूमिका दीपिका साकारत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: artist of film 83 congratulates team india on 37 anniversary