सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी मनोवैज्ञानिक सूसन वॉकरविरोधात दाखल केली तक्रार

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 9 September 2020

सुशांतचे वडिल केके सिंह यांनी सुशांतवर उपचार करत असलेल्या मनोवैज्ञानिक  सूसन वॉकरविरोधात मेडिकल नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

मुंबई- सुशांत मृत्यु प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. आता सुशांतचे वडिल केके सिंह यांनी सुशांतवर उपचार करत असलेल्या मनोवैज्ञानिक  सूसन वॉकरविरोधात मेडिकल नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. डॉक्टर सूसन वॉकर यांनी मिडियासमोर येऊन सुशांतसंबंधी बोलण्यास सुरुवात केली होती तसंच त्याच्या परिस्थितीचे डिटेल्स समोर आणले होते. 

हे ही वाचा: मनोरंजन विश्वाला आणखी एक झटका, तेलुगु टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या  

सुशांतच्या वडिलांनी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार केली आहे. ज्यामध्ये म्हटलंय की, 'सुशांत सिंह राजपूत आणि नोंदणीकृत डॉक्टर सूसन वॉकर यांच्यामध्ये झालेलं कोणतंही कंसल्टेशन हे गोपनीय आहे. आणि याचा खुलासा केल्याने हे मेडिकल काउंसिलच्या नियमांचं उल्लंघन केल्यासारखं आहे.'

सूसन वॉकर यांनी मुंबई पोलीस आणि सीबीआयला दिलेल्या जबाबामध्ये देखील सुशांतविषयी अनेक खुलासे केले होते. सुशांत उपचारासाठी आल्यावर रडायचा. त्याला सतत आत्महत्येचे विचार येत होते. त्याला बायपोलर डिसऑर्डने ग्रासलं होतं म्हणूनंच त्याला असे विचार येत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच त्याला नेहमी वाटायचं की तो कधीच यातून बरा होणार नाही. आणि यामुळे त्याच्या कुटुंबियांना त्रास भोगावा लागेल असं त्याला वाटलं असल्याने त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं असावं असं देखील त्यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं असल्याचं कळतंय. सुशांत त्याला बरं वाटल्यावर लगेच औषधं बंद करायचा तो व्यवस्थित उपचार घेत नव्हता त्यामुळे त्याचा हा आजार बळावल्याचं त्यांनी म्हटलं होतं.   

sushant singh rajput father kk singh files complaint against dr susan walker  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput father kk singh files complaint against dr susan walker