मनोरंजन विश्वाला आणखी एक झटका, तेलुगु टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 9 September 2020

अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी या वर्षात जगाचा निरोप घेतला. आता पुन्हा एकदा वाईट बातमी तेलुगु सिनेइंडस्ट्रीतून येत आहे. तेलुगु टीव्ही अभिनेत्री श्रावणीने आत्महत्या केली आहे.

मुंबई- २०२० हे वर्ष मनोरंजन विश्वाला एकापेक्षा एक झटका देणारं ठरत आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी या वर्षात जगाचा निरोप घेतला. आता पुन्हा एकदा वाईट बातमी तेलुगु सिनेइंडस्ट्रीतून येत आहे. तेलुगु टीव्ही अभिनेत्री श्रावणीने आत्महत्या केली आहे. या धक्कादायक बातमीनंतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे. प्रत्येकाला श्रावणीच्या आत्महत्येचं कारण जाणून घेण्याची उत्सुकत आहे.

हे ही वाचा: 'बिग बॉस १४' मध्ये भोजपूरी स्टार आम्रपालीच्या एंट्रीची जोरदार चर्चा

तेलुगु अभिनेत्री श्रावणीच्या आत्महत्येने सगळ्यांना पुन्हा एक धक्का बसला आहे. मात्र तिच्या आत्महत्येचं कारण अजुन समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणात केस दाखल केली असून तपास सुरु केला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, दिवंगत अभिनेत्री श्रावणीच्या कुटुंबियांनी देवराज रेड्डीवर आरोप केले आहे. रेड्डी यांच्या अत्याचारांमुळे श्रावणीवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलंय. असं म्हटलं जात होतं की देवराज श्रावणीला त्रास देत होता. त्यामुळे तिने हे कठोर पाऊल उचललं. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणीने मंगळवारी रात्री १० वाजता आत्महत्या केली. ती हैदराबाद येथील एस्सार नगरच्या पीएस मथुरा नगरमध्ये एच ५६ ब्लॉकच्या दुस-या मजल्यावर राहत होती. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी उस्मानिया हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. श्रावणीच्या कुटुंबियांनी देवराज रेड्डी विरुद्ध एप्सरनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यासोबतंच श्रावणीच्या भावाने आरोपीला जास्तीस जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. 

अभिनेत्री श्रावणी गेल्या ८ वर्षांपासून तेलुगु कार्यक्रमांमध्ये कार्यरत होती. श्रावणीच्या प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये 'मौनरागम' आणि 'मनसु ममता' सारख्या मालिकांचा समावेश आहे. श्रावणी सध्या 'मनसु ममता'मध्ये काम करत होती. तिच्या मृत्युनंतर चाहते सोशल मिडियावर तिला श्रद्धांजली देत आहेत.   

telugu tv actress sravani died by suicide  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: telugu tv actress sravani died by suicide