सुशांत सिंह राजपूतच्या फोटोसमोर बसलेला वडिलांचा भावनिक फोटो इंटरनेटवर व्हायरल 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

सुशांत सिंह राजपूतच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या फॅन पेजच्या ट्विटर हँडलवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

मुंबई : सुशांत सिंहच्या निधनाच्या इतक्या दिवसांनंतर देखील त्याच्या आठवणी सोशल मिडीयावर काढल्या जात आहेत. सुशांतचे जुने फोटो तसेच व्हिडीओ नव्याने पोस्ट केले जात आहेत. त्यासोबतच वेगवेगळ्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. त्यातच सुशांतच्या शोक सभेदरम्यान घेण्यात आलेला एक फोटो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये सुशांतचे वडिल मुलाच्या फोटोजवळ बसलेले दिसत आहेत. या फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, तसेच लोक यावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहेत. 

अभिनेत्री शिवांगी जोशी एक्झिट घेणार का....? का होतेय अशी चर्चा वाचा बातमी

सुशांत सिंह राजपूतच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या फॅन पेजच्या ट्विटर हँडलवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत सुशांतचे वडिल कृष्ण कुमार सिंह हे सुशांतच्या हार घातलेल्या फोटोसमोर बसलेले दिसत आहेत. मागच्या काही दिवसांपुर्वी सुशांतच्या पटना येथील घरात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आळे होते, ज्यामध्ये कुटूंबीय, नातेवाईक तसेच काही जवळचे मित्र सहभागी झाले होते. त्या प्रसंगाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. 

 

 

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबई येथील त्याच्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर मानसीक तणाव या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. तसेच बॉलिवुड मध्ये चालणार परिवारवाद या वर देखील विवाद सुरु झाले आहेत. सुशांतने त्याच्या टिव्ही मालिका ‘कीस देश मे है मेरा दिल’ पासून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने काम केलीली दुसरी मालिका ‘पवित्र रिश्ताने’ त्याची ओळख तयार झाली होती. त्यानंतर ‘काय पो चे’ चित्रपट सृष्टीत अभिनयाची सुरुवात केली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant singh rajput father sits near his portrait photo viral on internet