रिया चक्रवर्ती आता दुसऱ्या घराच्या शोधात, अडचण वाढली

riya chakravarthi
riya chakravarthi

मुंबई - रिया चक्रवर्तीच्या मागील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्या नंतर तिला मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं. दरम्यानच्या काळात सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपासही काही काळ भरकटला होता. त्यात रियाने आपली बदनामी झाल्याचा आरोप काही माध्यमांवर केला होता.

रियाच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना प्रचंड मानसिक त्रास झाल्याचेही तिनं यापूर्वी सोशल मीडियावर सांगितले होते. आता तिने नव्या घरात जाण्याचा विचार केला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऑगस्टमध्ये रिया चक्रवर्ती यांनी तिच्या इमारतीचा व्हिडिओ शेअर केल होता. ज्यामध्ये तिच्या इमारतीखाली पापाराजींची गर्दी दिसून येत होती. त्यामुळे रियाने मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी देखील केली. दरम्यान व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबईतील खार भागातला आहे.सुशांत आत्महत्या केस प्रकरणामध्ये ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर तिला आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला काही दिवस तुरूंगात देखील राहवं लागलं होतं. त्यानंतर रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढ ट्रोल झाली होती.

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास गुंतागुंतीचा होत असल्याची टीका काही सेलिब्रिटी यांनी केली होती. त्यातून बॉलिवूडमधले ड्रग कनेक्शन समोर आले होते. त्यात अडकलेल्या कलावंतांची नावे समोर आल्यानंतर बॉलिवूड मध्ये खळबळ उडाली होती. एकप्रकारे बॉलिवूडवर ग्रहण असल्याचा तो काळ होता असेही मत ज्येष्ठ कलावंत यांनी व्यक्त केले होते. सध्या सुशांत आत्महत्या प्रकरणात रियाची जामीनावर सुटका झाली आहे. मात्र तिच्या समोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार रिया आणि तिचे कुटुंबिय मोठ्या संकटांचा सामना करत आहेत. लवकरच ते नव्या घरी देखील शिफ्ट होणार असल्यांचं समजत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रियाचे आई-वडील नवीन घराच्या शोधात आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com