सुशांत आत्महत्येपूर्वी गुगलवर 'हे' सर्च करत होता?

sushant
sushant

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मिडियावर वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. मुंबई पोलीस सर्व बाजूने तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अद्यापही त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. एका रिपोर्टनुसार सुशांतच्या बाबतीतली एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे सुशांतने त्याच्या आत्महत्येपूर्वी काही तास आधी गुगलवर सर्च करत होता. 

सुशांतने त्याच्या आत्महत्येपूर्वी स्वतःलाच गुगलवर सर्च केल्याचं समोर येत आहे. जर सुशांतने असं केलं असेल तर पोलिसांच्या तपासात ही एक महत्वाची बाब ठरु शकते कारण असं म्हटलं जात होतं की सुशांत नैराश्याने ग्रस्त होता. 

एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहिनीनुसार, सुशांतच्या मोबाईल फॉरेन्सिक तपासात ही गोष्ट समोर आली आहे की त्याने त्याच्या आत्महत्येच्या दिवशी म्हणजेच १४ जूनला सकाळी १० वाजून १५ मिनिटांदरम्यान गुगलवर स्वतःचं नाव सुशांत सिंह राजपूत सर्च केलं होतं. या रिपोर्टमधून हे देखील समोर आलं आहे की सुशांतने यानंतर स्वतःशी संबंधित काही बातम्या आणि लेख देखील वाचले होते. 

सुशांतने १४ जून रोजी त्याच्या बांद्रा येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यु फाशी घेतल्याने गुदमरुन झाल्याचं समोर आलं आहे. आत्तापर्यंत सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणात २८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

याचदरम्यान सुशांतचा विसरा रिपोर्ट देखील समोर आलेला आहे. या रिपोर्टनुसार देखील  सुशांतच्या शरिरात कोणताच नशेचा किंवा विषारी पदार्थ आढळून आलेला नाही. पोलिस याबाबतीत आणखी काही लोकांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या चाहत्यांचं म्हणणं आहे की त्याने आत्महत्या केली नसून ही हत्या आहे.   

sushant singh rajput googled his name few hours before his demise  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com