
सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार वर चाहत्यांना पाहाता येणार आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांना त्याने अभिनय केलेला शेवटाचा चित्रपट ‘दिल बेचारा’ पाहण्यासाठी वाट पाहत आहेत. दरम्यान हा चित्रपट ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत होती. हा चित्रपट येत्या 24 जूलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार वर चाहत्यांना पाहाता येणार आहे. त्यासोबतच हा चित्रपट सब्स्क्रायबर्स सह इतरही सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे.
अभिनेत्री शिवांगी जोशी एक्झिट घेणार का....? का होतेय अशी चर्चा वाचा बातमी
दिल बेचारा या चित्रपटाबद्दल माहिती देत डिस्ने प्लस हॉटस्टार यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकांउंटवर चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करत या विषयी माहिती दिली आहे. ‘प्रेम, आशा आणि अंतहीन आठवणींची गोष्ट असलेला ‘दिल बेचारा’ 24 जूलै रोजी सर्वांना पाहाता येणार आहे, हा चित्रपट सब्स्क्रायबर्स आणि नॉन सब्सक्रायबर्स सह सर्वजण पाहू शकतील.’
सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबई येथील त्याच्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर मानसीक तणाव या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. तसेच बॉलिवुड मध्ये चालणार परिवारवाद या वर देखील विवाद सुरु झाले आहेत. सुशांतने त्याच्या टिव्ही मालिका ‘कीस देश मे है मेरा दिल’ पासून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने काम केलीली दुसरी मालिका ‘पवित्र रिश्ताने’ त्याची ओळख तयार झाली होती. त्यानंतर ‘काय पो चे’ चित्रपट सृष्टीत अभिनयाची सुरुवात केली होती.