Sushant Singh Rajput: आत्महत्येपूर्वी अशी होती सुशांतची अवस्था, धक्कादायक व्हिडिओ आला समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh rajput last video, sushant singh rajput, sushant singh rajput birthday

Sushant Singh Rajput Last Video: आत्महत्येपूर्वी अशी होती सुशांतची अवस्था, धक्कादायक व्हिडिओ आला समोर..

आज सुशांत सिंग राजपूतचा वाढदिवस. सुशांतने त्याच्या कारकीर्दीत अनेक सिनेमे गाजवले. हे सिनेमे सुशांतच्या दमदार अभिनयाची जाणिव करून देतात. अशातच सुशांतचा आत्महत्येपूर्वीचा शेवटचा व्हिडीओ समोर आलाय. यात सुशांतची एकदम वाईट अवस्था दिसत आहे.

(sushant singh rajput last video before his death)

या व्हिडिओत सुशांतला कोणीतरी तू दिवसभर जेवला का नाहीस असं विचारात आहे. सुशांत काहीसा सैरभैर आणि बावरलेला दिसतोय. तो प्रश्नाचं उत्तर देताना काहीतरी अस्पष्ट बोलतो. सुशांतची दाढी वाढलेली आणि केस अस्ताव्यस्त दिसत आहेत. एकूणच मृत्यूपूर्वी सुशांतची अवस्था बघून त्याचे फॅन्स भावुक झाले आहेत. या व्हिडिओखाली सुशांतच्या फॅन्सनी मिस यू म्हणत त्याची आठवण काढली आहे.

हेही वाचा: Sushant Singh Rajput: सुशांतच्या नावात दडलंय एक अनोखं रहस्य, तुम्हाला माहीतीये का?

सुशांतचे फॅन्स त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पासूनच इंस्टाग्रामवर कमेंटच्या माध्यमातून त्याला हॅपी बर्थडे म्हणत आहेत. आज दिवसभर सुशांतचे फॅन्स त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दिल बेचारा हा सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा ठरला. सुशांतला आदरांजली म्हणून हा सिनेमा हॉटस्टार वर फ्री मध्ये दाखवण्यात आला होता.

सुशांत एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी सिनेमात साकारलेली महेंद्र सिंग धोनीची भूमिका लोकप्रिय ठरली. याशिवाय काय पो चे, पिके, केदारनाथ, सोनचिरिया, शुध्द देसी रोमान्स, राबता अशा हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय. आज सुशांत आपल्यात नसला. तरी त्याची आठवण सदैव आपल्या स्मरणात असेल.

सुशांत सिंग राजपूतचं फॅन फॉलोइंग खूप आहे. सुशांत सुध्दा त्याच्या फॅन्सचा आदर करायचा. फॅन्स सुद्धा सुशांतवर भरभरून प्रेम करायचे. आज सुशांत आपल्यात नसला. तरी त्याची आठवण सदैव आपल्या स्मरणात असेल सुशांत जरी आपल्यात नसला तरी त्याचे फॅन्स त्याच्या आठवणी जागवत असतात