esakal | 'माझा भाऊ जगातील एकमेव अभिनेता', ज्याला मिळालं 'नासाकडून' ट्रेनिंग
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actor sushant singh rajput suicide case

'माझा भाऊ जगातील एकमेव अभिनेता', ज्याला मिळालं 'नासाकडून' ट्रेनिंग

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग (bollywood actor sushant singh rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाचा शोध अद्याप सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या आत्महत्या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाला. त्यानिमित्तानं त्याच्या बहिणीनं वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला होता. आतापर्यत या प्रकरणात वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे नाव आले होते. बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण देखील यावेळी बाहेर आले होते. सध्या सुशांतच्या बहिणीची एक पोस्ट चर्चेत आली आहे. (sushant singh rajput sister shweta singh kirti says he was only actor in the world trained by nasa yst88)

श्वेतानं (shweta singh) सुशांतच्या फॅन्सची एक पोस्ट शेयर केली आहे. त्या पोस्टमध्ये सुशांत सिंग हा अंतराळवीराच्या वेशात दिसत आहे. त्यावर श्वेतानं कमेंट केली आहे. कदाचित एक गोष्ट सुशांतच्या चाहत्यांना माहिती नसेल ती म्हणजे सुशांत हा दिग्दर्शक संजय पुरन सिंग (sanjay puran singh) यांच्या सायन्स फिक्शनचाही भाग होणार होता. मात्र ते त्याच्या आत्महत्येमुळे शक्य झाले नाही. श्वेतानं सुशांत आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा: 'प्रेग्नंट होते,अंगदला झाला होता कोरोना; नेहाचा धक्कादायक अनुभव

श्वेतानं लिहिलं आहे की, सुशांत हा बॉलीवूडमधील एकमेव असा अभिनेता आहे की, ज्यानं अंतराळवीराचे नासामध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. नासानं त्याला मदत केली होती. नंतर ती म्हणते जगातील एकमेव अभिनेता ज्याला नासानं ट्रेन केलं होतं. तो 2024 मध्ये चंद्रावर जाण्याच्या तयारीत होता. त्यानं त्याची पूर्ण तयारीही केली होती. आपला सुशांत हा आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद असल्याची भावना श्वेतानं व्यक्त केली आहे.

loading image