esakal | 'प्रेग्नंट होते,अंगदला झाला होता कोरोना; नेहाचा धक्कादायक अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

neha dhupia

'प्रेग्नंट होते,अंगदला झाला होता कोरोना; नेहाचा धक्कादायक अनुभव

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) दुसऱ्यांदा आई होणार असून गरोदर असल्याची तिने ही बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. नेहाने मुलगी मेहेर आणि पती अंगद बेदी (angad bedi) सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहा तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. अंगदने देखील हा फोटो शेअर केला. अनेक कलाकारांनी अंगदच्या या फोटोला कमेंट करत शुभेच्छा दिल्या नुकतेच एका मुलाखतीमध्ये नेहाने तिच्या प्रेग्नंन्सीमधील अनुभव शेअर केले आहेत.(i was pregnant when angad got covid neha dhupia share experience)

हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेहा म्हणाली, 'माझ्या प्रेग्नंसी दरम्यान अंगदला कोरोनाची लागण झाली. माझ्यासाठी हा काळ खूप कठीण होता. तुमच्या जवळच्या व्यक्तीला जर कोरोनाची लागण झाली तर तुम्हाला खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण अंगदने मला सकारात्मक राहण्यासाठी मदत केली. दुसऱ्यांदा आई होणे हा अनुभव खूप वेगळा आहे. माझ्या डोक्यात आधीपेक्षा कमी प्रश्न निर्माण होतात. मला काही गोष्टी पहिल्या प्रेग्नंन्सीमुळे माहित झाल्या आहेत. मी माझ्या या पहिल्या प्रेग्नंन्सीची तुलना आधीच्या प्रेग्नंसीसोबत करत होते. पण लॉकडाऊमुळे मला काही कठीण समस्यांचा सामना करावा लागला.'

हेही वाचा: नेहा धुपियाकडे पुन्हा 'गुड न्यूज'! दुसऱ्यांदा होणार आई

नेहा आणि अंगदने २०१८ मध्ये लग्न केले. लग्नाआधीच नेहा गर्भवती असल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं नंतर स्पष्ट झालं. नोव्हेंबर २०१८ मध्ये नेहाने मुलीला जन्म दिला.नेहाने 'सिंग इज किंग', 'तुम्हारी सुलू', 'हिंदी मीडियम', 'लस्ट स्टोरीज' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर अंगदने 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल', 'सूरमा', 'पिंक', 'डिअर जिंदगी', 'टायगर जिंदा है' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा: फक्त इंडस्ट्रीबाहेरील लोकांना काम देणार का? तापसी म्हणते..

loading image