सुशांतला न्याय मिळवून देण्याची अमेरिकेत देखील होतेय मागणी, बहीण श्वेताची पोस्ट

shweta singh kirti
shweta singh kirti

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युनंतर त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह झाली आहे. ती सतत सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी एक ना अनेक मोहीमा राबवत आहे. श्वेता अमेरिकेत राहते. यावेळी तिने अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील लोकांबद्दल सांगितलं आहे जे सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत.

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने तिचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, 'भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कॅलिफोर्नियाने माझा भाऊ सुशांतला ओळखलं आणि समाजात त्याच्या कामाला मान्यता दिली. कॅलिफोर्निया आमच्यासोबत आहे.समर्थन करण्यासाठी कॅलिफोर्नियाचे आभार.' 

श्वेताने आणखी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे ज्यामध्ये सुशांतच्या कुटुंबातील सगळे सदस्य दिसत आहेत आणि ते प्रार्थना करत आहेत. या व्हिडिओसोबत श्वेताने कॅप्शन दिलं आहे की, 'कृपया या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी हाथ जोडलेला तुमचा फोटो पोस्ट करा.' याआधी देखील श्वेताने एक व्हिडिओ पोस्ट करुन सीबीआय तपासाची मागणी केली होती. श्वेताने त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं 'माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सीबीआय तपासाची मागणी केली पाहिजे जेणेकरुन सत्य सगळ्यांसमोर येईल.'

आज १५ ऑगस्ट रोजी सुशांतसाठी जागतिक प्रार्थना ठेवली गेली होती. ही प्रार्थना सकाळी १० वाजता होती. सुशांतसाठी त्याच्या चाहत्यांनी मौन पाळत त्याला श्रद्धांजली वाहिली.   

sushant singh rajput sister shweta singh kirti share post  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com