दिशा सालियनच्या शेवटच्या कॉलचं सत्य उघडकीस, १०० नंबरवर नाही तर 'या' व्यक्तीला केला होता शेवटचा कॉल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 18 September 2020

नुकतीच अशी माहिती समोर आली होती की दिशाने तिच्या मोबाईलवरुन शेवटचा फोन १०० नंबरवर केला होता. मात्र पोलिसांनी ही अफवा असल्याचं म्हणत याबाबतचं पूर्ण सत्य सांगितलं आहे. 

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्युच्या काही दिवसांआधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा देखील मृत्यु झाला होता. तिचा मृत्यु आत्महत्या केल्यामुळे झाल्याचं सांगितलं गेलं मात्र अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की दिशाने आत्महत्या केली नाही तिचं सुशांतच्या प्रकरणाशी काहीतरी कनेक्शन नक्की आहे. नुकतीच अशी माहिती समोर आली होती की दिशाने तिच्या मोबाईलवरुन शेवटचा फोन १०० नंबरवर केला होता. मात्र पोलिसांनी ही अफवा असल्याचं म्हणत याबाबतचं पूर्ण सत्य सांगितलं आहे. 

हे ही वाचा:  सुशांतच्या पर्सनल नोट्समध्ये क्रितीचं नाव, 'सोबत वेळ घालवायचा आहे'  

मुंबई पोलिसांनी या १०० नंबर डायलचं रहस्य सांगितलं आहे. यावर त्यांनी अधिकृतरित्या स्टेटमेंट दिलं आहे. मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे की 'दिशा सालियनने शेवटचा फोन  १०० नंबरवर केला नव्हता तर तिची मैत्रीण अंकिताला फोन केला होता. दिशाने शेवटच्या क्षणी १०० नंबर डायल केला होता ही बातमी पूर्णपणे चूकीची आहे.'

दिशा सालियनचा मृत्यु ८ जूनला झाला होता. दिशा सुशांतची एक्स मॅनेजर होती. तर दिशानंतर १४ जूनला सुशांतने आत्महत्या करुन त्याचं जीवन संपवलं होतं. अशातंच सोशल मिडियासोबतंच अनेक जणांचं आणि सेलिब्रिटींचं म्हणणं आहे की सुशांत आणि दिशा यांच्या मृत्युचं एकमेकांसोबत काहीतरी कनेक्शन आहे. सोशल मिडियावर यूजर्सचं म्हणणं आहे की याचा तपास नीट व्हायला हवा जो मुंबई पोलिसांनी योग्यरित्या केलेला नाही. 

सीबीआय दिशा सालियनच्या केसचा तपास करत आहे. याआधी नितेश राणे यांनी दिशाच्या बॉयफ्रेंडला सवाल करत म्हटलं होतं की तो या केसमध्ये पुढे येऊन काही सांगत का नाहीये? त्याला सगळं माहित आहे. यासोबतचं राणे यांनी म्हटलं होतं की ते सीबीआय तपासात मदत करण्यासाठी देखील तयार आहेत.   

last call from disha salian phone was to her friend ankita claims to dial 100 the last time is false  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: last call from disha salian phone was to her friend ankita claims to dial 100 the last time is false