श्रध्दा कपुर आणि सारा अली खानच्या अडचणी वाढल्या की संपल्या ?

Shradha Kapoor And Sara Ali Khan denied thier aligations releted drugs nexus.jpg
Shradha Kapoor And Sara Ali Khan denied thier aligations releted drugs nexus.jpg

मुंबई - शनिवारची सकाळ आणि दुपार बाँलीवुड मधल्या त्या तीन अभिनेञींसाठी भलतीच ञासदायक ठरली. एनसीबीच्या कार्यालयातुन बोलावणे आल्यानंतर तातडीने तिकडे धाव घेणा-या दिपिका पादुकोण, श्रध्दा कपुर आणि सारा अली खान यांना दमछाक करणा-या चौकशीला सामोरे जावे लागल्याचे दिेसुन आले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या प्रकरणात एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली आहेत. 

दिपिकाने दिलेल्या उत्तरांवरुन एनसीबीच्या अधिका-यांचे समाधान झाले नाही. यानंतर चौकशीसाठी गेलेल्या श्रध्दा कपुरच्या चौकशीतुन काही ठोस समोर आले नाही. तर साराने एक मोठा खुलासा केला आहे. त्यात तिने सुशांत ड्रग घेत असल्याचे सांगुन खळबळ उडवुन दिली आहे. . रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली होती. सुशांत हा ड्रग्ज घेत असल्याची माहिती साराने एनसीबीला दिली आहे. यामुळे इतर कलाकारांच्या चौकशीतुन आणखी कुठली महत्वपुर्ण बाब समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

२५ सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांची एनसीबीने चौकशी केली. यात जवळपास चार तास रकुलची चौकशी करण्यात आली. दुसरीकडे बाँलीवुडचा प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहरला समन्स बजावण्यात आल्यानंतर त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याबाबत खुलासा केला आहे. तो म्हणतो, त्या पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे सेवन करण्यात आले नाही. मी स्वत: अशा पदार्थांचे सेवन करणा-यांच्या बाजुने उभा राहत नाही आणि त्यांचे समर्थनही करत नसल्याचे त्याने म्हटले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com