esakal | सुशांत ड्रग्ज घ्यायचा मी ड्रग्ज घेतलं नाही : सारा अली खान 
sakal

बोलून बातमी शोधा

sara ali-khan and sushant-singh-rajput.jpg

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या प्रकरणात एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली होती. सुशांत हा ड्रग्ज घेत असल्याची माहिती साराने एनसीबीला दिली आहे.

सुशांत ड्रग्ज घ्यायचा मी ड्रग्ज घेतलं नाही : सारा अली खान 

sakal_logo
By
युगंधर ताजणे

 मुंबई  -  सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा शोध घेत असताना बाँलीवुड मधील ड्रग्ज कनेक्शन उडकीस आले आहे. शनिवारी सकाळी दिपिका पादुकोण, श्रध्दा कपुर आणि सारा अली खान हिला चौकशीसाठी एनसीबीकडुन बोलविण्यात आले. या चौकशीत दिपिकाकडुन तितकीशी समाधानकारक उत्तरे न मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे सारा अली खानच्या चौकशीतुन एक नवा खुलासा एनसीबीच्या हाती आला आहे. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या प्रकरणात एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली होती. सुशांत हा ड्रग्ज घेत असल्याची माहिती साराने एनसीबीला दिली आहे. यामुळे इतर कलाकारांच्या चौकशीतुन आणखी कुठली महत्वपुर्ण बाब समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रकुलप्रीत सिंहने रिया चक्रवर्तीवरंच फोडलं खापर, ड्रग्स सेवन प्रकरणी दिला नकार

दीपिका पदुकोन, ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे पुढे  आली आहेत .एनसीबीकडून त्यांची चौकशी केली जात आहे. रकुलसोबत, श्रद्धा कपूर आणि सारा खान यांची एनसीबीकडून सध्या चौकशी सुरु आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकणावर गीतकार जावेद अख्तर यांनी परखड मत व्यक्त केले आहे.

ड्रग्ज  प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे समोर आली असताना   गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी बॉलिवूडची बाजू घेतली असुन आरोग्याची इतकी काळजी घेणाऱ्या या सेलिब्रेटींना  ड्रग्जचं व्यसन आहे म्हणणं मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना फिल्म इंडस्ट्रीविरोधातील मोहीम कमी होताना दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. ते म्हणाले,  “विषय बदलत चालले आहेत, पण फिल्म इंडस्ट्रीविरोधातील मोहीम कमी होताना दिसत नाही. 

loading image
go to top