Sushant चा फोटो असलेल्या टी-शर्टवर वादग्रस्त कॅप्शन, चाहत्यांचा राग अनावर

सुशांत सिंग राजपूतचे निधन १४ जून २०२० रोजी झाले होते. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आत्महत्या करुन त्यानं जगाचा निरोप घेतला होता.
Sushant Singh Rajput's fans slam online shopping company for selling T-shirts with 'misleading' message about actor's death
Sushant Singh Rajput's fans slam online shopping company for selling T-shirts with 'misleading' message about actor's deathGoogle

बॉलीवूडला मिळालेला एक चांगला नट म्हणजे सुशांत सिंग राजपूत(Sushant SIngh Rajput) 2020 साली अचानक आपल्यातून निघून गेला अन् त्याच्या चाहत्यांपासून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. ती एक मोठी अनपेक्षित घटना होती. सुशांत डिप्रेशनचा सामना करत होता म्हणून त्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जातं. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या फेमच्या सहाय्यानं नाव कमावण्याची संधी अनेकांनी घेतली. आपण हे कळल्यावर हैराण व्हाल की त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी आजही हा सिलसिला सुरुच आहे.(Sushant Singh Rajput's fans slam online shopping company for selling T-shirts with 'misleading' message about actor's death)

आता या सगळ्या प्रकरणात ऑनलाईन शॉपिंग साइट असलेल्या फ्लीपकार्टवर विक्रीसाठी असलेल्या एका टीशर्टला पाहून लोक राग राग करतायत. टी-शर्ट तरआहे त्याच्यावर इतकं का चिडायचं? आणि सुशांतचे काय कनेक्शन? मुद्दा हाच आहे की हा काही नॉर्मल टी-शर्ट नाही. टी-शर्टवर सुशांत सिंग राजपूतचा फोटो छोपलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त शॉकिंग आहे त्याच्यावर लिहिलेलं कॉन्टेन्ट. टी-शर्टवरील फोटोला कॅप्शन देताना लिहिलं आहे,डिप्रेशन सर्वनाश करतो. तुम्हा घेऊन बुडतो. (Depression is like Drowing).हा टी-शर्ट फ्लिपकार्टवर १७९ रुपयांना विकला जात आहे. याची मूळ किंमत १०९९ इतकी लिहिली गेली आहे.

Sushant Singh Rajput's fans slam online shopping company for selling T-shirts with 'misleading' message about actor's death
'जॅकलिनच्या तुलनेत कतरिनाच...'; सलमान खानला आली मिसेस कौशलची आठवण

दिवंगत अभिनेता सुशांतचा फोटो छापलेला हा टी-शर्ट अशा पद्धतीनं कॅप्शन लिहून विक्रीस ठेवल्याने लोकांच्या रागाचा पारा भलताच चढला आहे. ट्वीटरवर फ्लिपकार्टला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. सुशांतचं नाव डिप्रेशनशी जोडलं गेलं आहे हे पाहून त्याचे चाहते भडकलेयत. लोकांचे म्हणणे आहे की सुशांतला डिप्रेशनने नाही तर बॉलीवूडच्या माफियांनी मारलं आहे. एका नेटकऱ्याने सुशांतप्रती चुकीची समजूत समाजात पसरवणारं कॅप्शन टी-शर्टवर दिल्या प्रकरणी फ्लिपकार्टला कायदेशीर नोटीस पाठवण्याची गोष्ट देखील बोलून दाखवली आहे.

सुशांत सिंग राजपूतचे निधन १४ जून २०२० रोजी झाले होते. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आत्महत्या करुन त्यानं जगाचा निरोप घेतला होता. सुशांतने आपल्या मुंबईतील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. सुशांतची केस कोर्टात खूप लांबवर चालली,कितीतरी एजन्सीजनी या केससंदर्भात तपासणी केली होती. पण अद्याप कोणताही निष्कर्ष या केससंदर्भात निघालेला नाही. सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण काय होतं याचा खुलासा होणं अजूनही बाकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com