अभिनेता सुशांतचे शेवटचे गाणे येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; वाचा सविस्तर...

संतोष भिंगार्डे
Thursday, 9 July 2020

आता सुशांतच्या चित्रपटाचा टायटल ट्रॅक प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हे गाणे सुशांत आणि संजनावर चित्रित झाले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने केली आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आणि त्याला कोट्यवधी चाहत्यांची पसंती मिळाली. या चित्रपटाच्या ट्रेलरने विक्रम केला आहे. आता सुशांतच्या चित्रपटाचा टायटल ट्रॅक प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हे गाणे सुशांत आणि संजनावर चित्रित झाले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने केली आहे. 

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांना अखेरचा निरोप; माझगाव कब्रस्थानात झाला दफनविधी...

सुशांतच्या जीवनातील हे शेवटचे गाणे आहे. या गाण्यामध्ये सुशांत चांगलाच थिरकला आहे. त्याचे चाहते हे गाणे आणि हा चित्रपट पाहण्यास कमालीचे उत्सुक आहेत. 

लॉकडाऊन असतानाही नवी मुंबईत का वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या नेमकी परिस्थिती...

प्रसिद्ध दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान म्हणते, की सुशांतबरोबर मी पहिल्यांदाच काम केले आहे. आमच्यामध्ये चांगली मैत्री होती पण एकत्र काम करण्याची संधी कधी आली नव्हती, ही संधी या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांच्यामुळे मिळाली. आम्ही एक दिवस गाण्याची रिहर्सल केली आणि दुसऱ्या दिवशी हे गाणे शूट केले. सुशांतने या गाण्यावर धमाल डान्स केला आहे. हे गाणे मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. हा चित्रपट 24 जुलै रोजी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची वाट पाहात आहेत. 
----
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput's last movie dil bechara songs will release soon...