कतरिना कैफचा 'हा' डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
शुक्रवार, 31 जुलै 2020

कतरिनाचा एक जुना व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकुळ घालतोय.या व्हिडिओमध्ये कतरिना तिच्या प्रसिद्ध गाण्यावर म्हणजेच 'शीला की जवानी'वर डान्स करतेय.

मुंबई- कतरिना कैफचा जलवा सोशल मिडियावर नेहमीच पाहायला मिळतो. एखाद्या कार्यक्रमातील किंवा मग पुरस्कार सोहळ्यातील तिचे डान्स व्हिडिओ तर आल्या आल्या व्हायरल होतात. सध्या असाच एक तिचा जुना व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकुळ घालतोय.या व्हिडिओमध्ये कतरिना तिच्या प्रसिद्ध गाण्यावर म्हणजेच 'शीला की जवानी'वर डान्स करतेय.

हे ही वाचा: ''मुंबई पोलिसांमधील कुणीतरी रिया चक्रवर्तीला करतंय मदत''

कतरिना कैफचे डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. तिच्या डान्स मुव्ह्ज आणि तिचा ग्लॅमरस अंदाज पाहण्यासाठी लाखो चाहते तुटुन पडतात. असाच हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा डान्स व्हिडिओ द युनिवर्सल पेगिनेट्री युट्युब अकाऊंटवरुन पोस्ट केला गेला आहे. कतरिना मिस इंडिया २०१९ च्या कार्यक्रमात तिचा हा जबरदस्त परफॉर्मन्स देताना दिसतेय.हा व्हिडिओ आत्तपर्यंत १० लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे. कतरिनाचा जबरदस्त डान्स, तिचा जलवा चाहत्यांना घायाळ करतोय.

कतरिना कैफ त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जिची सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोईंग आहे. कतरिना सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबतच नेहमी संपर्कात असते. लॉकडाऊनमध्येही कतरिना घरात कसा वेळ घालवत होती याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत होती. अभिनेत्री कतरिना कैफ अभिनयासोबतंच तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे.

बॉलीवूडच्या सगळ्यात स्टायलिस्ट अभिनेत्रींपैकी तर एक ती आहेच मात्र बॉलीवूडची महागडी अभिनेत्री देखील आहे. कतरिना सलमानसोबत 'भारत' या सिनेमात शेवटची दिसून आली होती. यानंतर अक्षय कुमार 'सूर्यवंशी' सिनेमात ती दिसून येणार आहे. हा सिनेमा मार्चमध्ये रिलीज होणार होता मात्र कोरोनाच्या संकटामुळे याची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.   

katrina kaif dance on sheila ki jawani song video viral on internet  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: katrina kaif dance on sheila ki jawani song video viral on internet