esakal | सुशांतचा मित्र युवराज म्हणाला, 'बॉलीवूडमध्ये कॉमन आहे गांजा तर कोकीन आहे पार्टी ड्रग'
sakal

बोलून बातमी शोधा

sushants friend yuvraj on drugs

युवराजने म्हटलं की बॉलीवूडमध्ये ड्रग संस्कृती चालते. इंडस्ट्रीमध्ये पुढे जायचं असेल तर हा देखील एक मार्ग असल्याचं मानलं जातं. त्याने दावा केला आहे की बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर बडे सेलिब्रिटी कोकिन ड्रगशी ऍडीक्ट आहेत. 

सुशांतचा मित्र युवराज म्हणाला, 'बॉलीवूडमध्ये कॉमन आहे गांजा तर कोकीन आहे पार्टी ड्रग'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र अभिनेता आणि निर्माता युवराज सिंहने एक महत्वाचा खुलासा केला आहे. त्याने म्हटलंय की बॉलीवूडमध्ये ड्रग संस्कृती चालते. त्याने हे देखील म्हटलं की इंडस्ट्रीमध्ये पुढे जायचं असेल तर हा देखील एक मार्ग असल्याचं मानलं जातं. त्याने दावा केला आहे की बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर बडे सेलिब्रिटी कोकिन ड्रगशी ऍडीक्ट आहेत. 

हे ही वाचा:  'जर अभिषेकने फास लावून घेतला असता तर...?' कंगनाचा जया बच्चन यांना थेट सवाल  

अभिनेता आणि निर्माता युवराज सिंहने बॉलीवूड आणि ड्रग कनेक्शनबाबत अनेक आश्चर्यजनक खुलासे केले आहेत. युवराजने सांगितलं की 'जवळपास ७० च्या दशकापासूनंच बॉलीवूडमध्ये ड्रग्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र त्यावेळची काळ वेगळा होता. आता सोशल मिडियामुळे गोष्टी उघडकीस यायला लागल्या आहेत. '

युवराजने बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध ड्रग विषयी बोलताना सांगितलं की 'गांजा तर अगदी कॉमन आहे सिगारेट सारखा. कॅमेरामनपासून ते टेक्निशिअन्स पर्यंत, सेटवर हजर असलेले लोक सर्रास गांजाचं सेवन करतात. बॉलीवूड पार्ट्यांमध्ये जास्तकरुन कोकिन चालतं. कोकीनंच बॉलीवूडचं मुख्य ड्रग आहे. याव्यतिरिक्त एमडीएमए ज्याला एक्टेसी म्हणतात आणि एलएसडी ज्याला एसिड म्हणतात यांचा देखील वापर केला जातो. याशिवाय केटामाईनचं सेवन देखील केलं जातं. हे सगळे हार्ड ड्र्ग्स आहेत ज्याचा प्रभाव १५ ते २० तास राहतो. कोकिन सगळ्यात हार्ड ड्रग आहे आणि मी सांगू इच्छितो की  ५ ते ८  असे सेलिब्रिटी आहेत ज्यांना हे सोडण्याची अत्यंत गरज आहे नाहीतर हे लोक मरतील.'

युवराजने गेल्या वर्षी व्हायरल झालेल्या एका पार्टीच्या व्हिडिओचा उल्लेख देखील केला ज्यामध्ये ही पार्टी करण जोहरच्या घरी झाली होती. यात दीपिका पदूकोण, रणबीर कपूर, मलाईका अरोरा, विकी कौशल, वरुण धवन, शाहिद कपूर सारख्या कलाकारांचा समावेश होता. आणि असा आरोप होता की या पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर केला जात होता. त्याने म्हटलं की 'गेल्या वर्षी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता ती देखील एक ड्रग पार्टीच होती.'

युवराजने कोकिन ऍडीक्ट कलाकारांची नावं सांगण्यास नकार दिला पण  बॉलीवूडचे टॉपचे १० ते १५ सेलिब्रिटी हे कोकिन ऍडीक्ट असल्याचं त्याने म्हटलंय. इतकंच नाही तर त्याने हिंट देत सांगितलं 'काही ए लिस्टर्स सेलिब्रिटी ज्यामध्ये ते १० ते १५ जण असतील यात अक्षय कुमारला सोडा कारण तो कामाप्रती प्रामाणिक अभिनेता आहे. बाकी सगळ्यांनी लॉबी बनवली आहे ज्यामुळे नेपोटिझम फोफावला आहे.'

sushants friend yuvraj claims that weed is common and cocaine is bollywood party drug