esakal | सुशांत प्रकरणात चर्चेत असलेल्या 'मिस्ट्री गर्ल'चं सुशांतसोबत असलेल्या नात्याचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

mystry girl sushant

सुशातंच्या मृतदेहाजवळ एका मिस्ट्री गर्लला पाहिल्यानंतर सगळीकडून केवळ एकच प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? आणि सुशांतसोबत नेमकं तिचं काय नातं आहे?

सुशांत प्रकरणात चर्चेत असलेल्या 'मिस्ट्री गर्ल'चं सुशांतसोबत असलेल्या नात्याचा खुलासा

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एक एक खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात एफआयआर दाखल केल्यापासून प्रकरणाला वळण मिळालं आहे. या प्रकरणाचा तपास ईडी आणि सीबीआय करत आहेत.सुशातंच्या मृतदेहाजवळ एका मिस्ट्री गर्लला पाहिल्यानंतर सगळीकडून केवळ एकच प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

हे ही वाचा: कॅन्सरच्या उपचारांसाठी अमेरिकेला जाणार संजय दत्त, आई नर्गिसवर उपचार झालेल्या हॉस्पिटमध्ये होऊ शकतो दाखल

सुशांतच्या मृतदेहाजवळ असलेल्या ज्या मिस्ट्री गर्लची सतत चर्चा होताना दिसतेय ती मिस्ट्री गर्ल आहे राधिका निहलानी. राधिका सुशांतची पीआर आणि असिस्टंट होती. थिंकइंक या पीआर कंपनीची ती सहसंस्थापक आहे सोबतंच ती सुशांतचा पीआर पाहत होती. राधिकाची जास्त चौकशी अजुन झालेली नाहीये. मात्र मुंबई पोलिसांच्या आतील गोष्टींची माहिती ठेवणा-या सुत्रांचं म्हणणं आहे की सुशांतच्या आयुष्यात सुरुवातीपासून ते त्याच्या निधनापर्यंत जेवढे पीआरओ सक्रिय होते ते सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहेत.

याआधी या मिस्ट्री गर्ल विषयी असं म्हटलं जात होतं की ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून रिया चक्रवर्तीची मैत्रीण आणि फरहान अख्तरही गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर आहे. मात्र स्वतः शिवानीने याबाबतीतलं सत्य सगळ्यांसमोर येऊन सांगितलं आहे. तिने ट्विट करत म्हटलंय की, 'ही मी नाही आहे. कृपया संशय घेण्याआधी सत्यता पळताळून पाहा. ही सुशांत सिंह राजपूतची पीआर आणि असिस्टंट राधिका निहलानी आहे. चूकीच्या बातम्या पसरवणं बंद करा. खूप झालं. माझं गप्प राहणं तुम्हाला या गोष्टीची मुभा देत नाही की तुम्ही खोटं आणि द्वेष पसरवू नका.'

व्हायरल व्हिडिओमध्ये निळ्या आणि सफेद रंगाच्या शर्टमध्ये मुंबई पोलिसांच्या हजेरीमध्ये सुशांतच्या बिल्डिंगमध्ये जाताना या मुलीला पाहिलं गेलं होतं. ही मुलगी एका व्यक्तीसोबत बोलत असते मात्र जेव्हा ती व्यक्ती पुन्हा परत येते तेव्हा त्याच्या हातातली बॅग गायब होते.   

sushat singh rajput case know who is radhika nihlani as mystery girl  

loading image
go to top