esakal | कॅन्सरच्या उपचारांसाठी अमेरिकेला जाणार संजय दत्त, आई नर्गिसवर उपचार झालेल्या हॉस्पिटलमध्ये होऊ शकतो दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay dutt

संजय दत्तने गेल्याच आठवड्यात कोकिलाबेन हॉस्पटिलमध्ये सुरुवातीचे काही उपचार केले होते. याचदरम्यान संजय दत्तशी संबंधित एक माहिती समोर आली आहे.  

कॅन्सरच्या उपचारांसाठी अमेरिकेला जाणार संजय दत्त, आई नर्गिसवर उपचार झालेल्या हॉस्पिटलमध्ये होऊ शकतो दाखल

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेता संजय दत्त सध्या फुफ्फुसाच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मिडियावर तो तब्येतीच्या काही कारणांमुळे ब्रेक घेत असल्याचं म्हटलं होतं. संजय दत्त त्याच्या कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी अमेरिक किंवा सिंगापूरला जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. गेल्याच आठवड्यात त्याने कोकिलाबेन हॉस्पटिलमध्ये सुरुवातीचे काही उपचार केले होते. याचदरम्यान संजय दत्तशी संबंधित एक माहिती समोर आली आहे.  

हे ही वाचा: अमाल मलिकचं सलमान खानच्या चाहत्यांसोबत ट्विटरवॉर, शिव्या देणा-यांना दिलं सडेतोड उत्तर

संजय दत्तने उपचारांच्या आधारावर अमेरिकेत पाच वर्षांपर्यंतचा वीजा मिळवला आहे. लवकरंच तो पत्नी मान्यता आणि बहीण प्रियासोबत न्युयॉर्कला जाणाच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, संजय दत्तने कॅन्सर झाल्यावर लगेचच वीजा मिळवण्यासाठी अप्लाय केलं होतं. सुत्रांच्या माहितीनुसार, तो न्युयॉर्कमधील मेमोरियल स्लोन केटरिंग कैंसर सेंटरमध्ये उपचार घेणार आहे. संजय दत्तची आई नर्गिस दत्त देखील याच हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या उपचारांसाठी दाखल होती. 

यादरम्यान संजयची पत्नी मान्यता दत्तने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. देव, तुमच्या शांतीचं रक्षण करो. तुमच्या प्रार्थनांंचं उत्तर मिळो. संजय दत्तला ८ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी मान्यता दोन्ही मुलांसोबत दुबईमध्ये होती. लॉकडाऊनमुळे ती दुबईमध्ये अडकली होती. संजय दत्तची तब्येत बिघडल्यानंतर ती मुंबईत पोहोचली. त्यानंतर ११ ऑगस्टला संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. तेव्हापासून त्याचे चाहते आणि सेलिब्रिटी त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.   

maanayata dutt share post may sanjay dutt fly to newyork for treatment  

loading image
go to top