सुश्मिताच्या कडेवर 'तो' चिमुकला कोण? मुलगा दत्तक घेतल्याची चर्चा Sushmita Sen | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushmita Sen with Renee,Alisah and New family member

सुश्मिताच्या कडेवर 'तो' चिमुकला कोण? मुलगा दत्तक घेतल्याची चर्चा

सुश्मिता सेननं(Sushmita Sen) 'मिस युनिव्हर्स' खिताब जिंकलं तेव्हाच तिनं मनाशी ठरवलं होतं की आपण अनाथ मुलांची आई बनणार. तसं तिनं बोलूनही दोखवलं होतं. पण बऱ्याचदा काय होतं की लॅमलाइटमध्ये येण्यासाठी सेलिब्रिटी अनेक गोष्टी बोलून जातात खरं पण त्यातल्या किती गोष्टी ते प्रत्यक्षात करून दाखवतात हे सांगणं मात्र थोडं कठीण आहे. पण सौंदर्यासोबतच बुद्धीची उत्तम जोड मिळालेल्या सुश्मिता सेननं उत्तम अभिनयाचं करिअर सुरू झालेलं असतानाही वयाच्या २४ व्या वर्षी एका लहानगीची आई बनण्याचं धाडस केलं अन् रीनी ही पहिली मुलगी दत्त घेतली. आता रीनी विशीच्या उंबरठ्यावर आहे. त्यानंतर २०१० मध्ये सुश्मितानं अलिशा या आपल्या दुसऱ्या मुलीला दत्तक घेतलं. ती जे बोलली होती ते तिनं करून दाखवलं. पण नुकतंच तिनं आपल्या कुटुंबातील एका नवीन सदस्याची ओळख करून दिली आहे. तिनं तिसरा मुलगा दत्तक घेतल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. पहिल्यांदाच तिनं आपल्या या तिन्ही मुलांसोबत कॅमेऱ्यासाठी पोझ दिली.

काल रात्री ती आपल्या या तिन्ही मुलांसोबत तिच्या इमारतीच्या गेटमधून बाहेर पडतानाच तिला मीडियाच्या कॅमेऱ्यांनी गाठलं. पण सुश्मितानंही कुठले आडेवेढे न घेता आपल्या या तिसऱ्या लहानग्या मुलाला अगदी कडेवर घेत खूप छान पोझ दिल्या. ऑफिशीयली तिनं स्वतः कुठलीही अनाऊंसमेंट अजून केलेली नाही पण तिच्या चाहत्यांनी मात्र अंदाज बांधले आहेत. तिचे तिच्या तिन्ही मुलांसोबतचे फोटो-व्हिडीयो व्हायरल झाले आहेत. तिच्या चाहत्यांनी यावर कमेंटदेताना सुश्मिताचं भरभरून कौतूक केलं आहे. तिच्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवायला हव्यात असंही एका चाहत्यानं म्हटलंय.

हेही वाचा: म्हणून अक्षयवर आली होती चोरीची वेळ

काही दिवसांपूर्वीच सुश्मिता चर्चेत आली होती ते तिच्या लॉंग टाईम बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअप पोस्टमुळे. तिने स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. तिनं दोघांचा फोटो शेअर करत म्हटलं होतं की,''आमचं नातं मैत्रीपासून सुरू झालं अनं आताही मैत्रीवर येऊन थांबलं. प्रेमाचं नातं संपलं असलं तरी मैत्री कायम असेल'', असं तिनं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. रोहमननं तिचं घर त्या पोस्ट आधीच सोडल्याच्या बातम्या होत्या. तो आता त्याच्या मित्राच्या घरी राहत आहे. रोहमन चॅप्टर सुश्मितासाठी संपला असला तरी नवीन दत्तक मुलाच्या घरी येण्यानं सुश्मिताचं घर मात्र पुन्हा आनंदून गेलं असणार एवढं मात्र नक्की. 'आर्या २' या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेबसिरीजमधील तिच्या अभिनयानंही तिनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top