
Lalit Modi Sushmit Sen news: आयपीएलचे निर्माते ललित मोदी यांनी ट्विट करुन गोड बातमी दिली. त्यानंतर सोशल मीडियावर कौतूकाला उधाण आले होते. मोदी आणि सुष्मिता हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात (IPL Lalit Modi) व्हायरल झाल्या होत्या. त्यावरुन वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. काही वेळापूर्वी कमाल खाननं (KRK Khan) दिलेल्या टोमणेवजा प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यासगळ्यात सुष्मिताच्या भावाची राजीव सेनची प्रतिक्रियाही व्हायरल झाली आहे. त्यानं तर वेगळाच खुलासा करुन नेटकऱ्यांना कोड्यात टाकले आहे. कालपासून ललित मोदी आणि सुष्मिता हा विषय सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे. (Social media viral news)
ललित मोदी हे आयपीएलमुळे चर्चेत आले. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा (Sushmita Sen Brother Rajeev Sen) झालेला आरोप, त्यांनी परदेशी केलेलं पलायन यामुळे त्यांच्यावरील संशय आणखी वाढला. विजय माल्या, नीरव मोदी आणि ललित मोदी यांना भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. असे असताना ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या लवस्टोरीनं वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. त्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. यासगळ्यात सुष्मिताच्या भावानं राजीव सेननं दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ललित मोदींनी 2010 मध्ये देश सोडला होता. त्यांच्यावर आयपीएलमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर सेलिब्रेटी असणारा राजीव म्हणतो की, सध्या सुष्मिता आणि ललित मोदी यांचे जे काही चालले आहे त्याविषयी आम्हाला तर काहीच माहीती नाही. सुष्मितानं देखील काहीच सांगितलेलं नाही. तिनचं अजुन खात्रीशीरपणे कुठेही वाच्यता केलेली नसल्यानं मला त्यावर काही बोलता येणार नाही. मीच अजुन तिच्या उत्तराची वाट पाहतो आहे. जेव्हा सोशल मीडियावर बातम्या पाहिल्या तेव्हा मलाच धक्का बसला. मला काही बोलण्यापूर्वी मी माझ्या बहिणीशी बोलणं पसंत करेल. असं राजीवनं म्हटलं आहे.
गुरुवारी ललित मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली . त्यामध्ये त्यांनी आपण सुश्मिताला डेट करत असल्याचे म्हटले होते. त्यांनी तिच्या नावाचा उल्लेख बेटर हाफ असाही केला होता. माझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरु झाले आहे. असं मोदी म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.