Sushmita Sen Car: ललित मोदी रुग्णालयात अन् सुश्मितानं घेतली 2 कोटीची कार.. होतेय चर्चा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushmita Sen gifts herself Mercedes car worth ₹1.92 crore

Sushmita Sen Car: ललित मोदी रुग्णालयात अन् सुश्मितानं घेतली 2 कोटीची कार.. होतेय चर्चा..

Sushmita Sen : 'मिस इंडिया', 'मिस युनिव्हर्स' आणि कित्येक चित्रपट सुपरहिट करणारी सुपरहॉट अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. ती चित्रपटात असो वा नसो या ना त्या कारणाने ती लाईम लाइट मध्ये असे हे नक्की. काही दिवसांपूर्वी ती ललित मोदी प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आली होती, तर आता चर्चा होतेय तिच्या गाडीची.. तेही चक्क 2 कोटीच्या गाडीची..

(Sushmita Sen gifts herself Mercedes car worth ₹1.92 crore)

काही दिवसांपूर्वीच बीसीसीआय चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती फारशी ठीक नसल्याचे समोर आले. त्या निमित्ताने पुन्हा एकदा ललित आणि सुश्मिता यांच्या नात्याची चर्चा झाली. त्याला आठ दिवस कुठे उलटले नाही तोवरच सुश्मिता पुन्हा चर्चेत आली.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Saif Ali Khan troll: अर्रर्र.. सैफला काय झालं? मलायकासारखं का चालतोय? नेटकऱ्यांनी उडवलाय दंगा..

नुकतेच तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत खुश दिसत असून ती स्वतःलाच एक गिफ्ट दिलं आहे. आणि ते गिफ्ट आहे एक आलीशान गाडी. सुश्मिताने Mercedes AMG 53 Coupe ही नवी गाडी खरेदी केली आहे.

तिला गाडी चालवायला प्रचंड आवडतं शिवाय नवनवीन गाड्या खरेदी करायला आवडतात त्यामुळे तिच्या कार कलेक्शन आणखी एका गाडीचा समावेश झाला आहे. या क्षणाचे फोटों शेयर करत 'ज्या महिलांना ड्रायविंग करणं आवडतं त्या महिला स्वत:ला सुंदर गिफ्ट देतात' असे तिने लिहिले आहे.


अभिनेत्री ब्लॅक कलरची Mercedes AMG 53 Coupe गाडी खरेदी केली. गाडी घरी येताच सुष्मिता फार खुश झाली होती. तिनं गाडीला मॅचिंग ब्लॅक आऊटफिट्स कॅरी केले होते.  सुष्मितानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची मर्सिडिज कार चकाकताना दिसतेय. मोठ्या अभिमानानं सुष्मिता त्या गाडीत बसली, सिटबेल्ट लावला आणि एकटीच लाँग ड्राइव्हसाठी निघून गेली.

सुश्मिताने घेतलेल्या ब्लॅक कलर Mercedes AMG 53 Coupe या गाडीची अंदाजे किंमत 2 कोटी रुपये आहे. तिच्या या आनंदात तिचे चाहतेही सहभागी झाले असले तरी ललित मोदी आजारी असताना तिने इतकी महागडी गाडी घेतली म्हणून अनेकांनी तिच्यावर टीकाही केली आहे.