Sushmita Lalit Affair: एक्स बॉयफ्रेंडचा मोलाचा सल्ला, 'आता तू पहिल्यांदा...'|Sushmita Sen Lalit Modi love story ex boyfriend Rohman | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushmita Lalit Affair

Sushmita Lalit Affair: एक्स बॉयफ्रेंडचा मोलाचा सल्ला, 'आता तू पहिल्यांदा...'

Sushmita Lalit Affair: मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. देशातील मीडियामध्ये तिचं नाव हे आयपीएलमध्ये भ्रष्टाचार केलेल्या ललित मोदीसोबत जोडले गेले आहे. त्यानेच (lalit modi dating news) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आणि सुष्मितासोबत डेटिंग सुरु असल्याचे सांगितले होते. त्यावरुन नेटकऱ्यांनी सुष्मितावर एवढी टीका केली की, दुसऱ्याच दिवशी तिला त्या (sushmita love story news) प्रतिक्रियांची दखल घ्यावी लागली. आपण कुणाच्याही प्रेमात नाही, आपलं काही डेटिंग नसून सगळं काही वेटिंग आहे. असं म्हटलं होतं.

यासगळ्या प्रकरणावर सुष्मिताचे कुणी कान टोचले नसते तर नवल म्हणावे (sushmita trolled) लागले असते. मात्र आपल्याकडे सेलिब्रेटींवर टीका करण्यासाठी नेटकरी नेहमीच तयार असतात. बांग्लादेशी लेखिका तस्लिमानं तर सुष्मितावर हे (taslima nasreen) सगळं पैशांसाठी करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे खवळलेल्या सुष्मितानं कुणीही मला काही शिकवण्याची गरज नसून मी काय केलं आहे, काय करते आहे याची मला चांगली समज आहे. माझ्याकडे चांगलं आयुष्य जगण्यासाठी मुबलक पैसा असल्याचे सांगितले होते. गोल्ड डिगर असं म्हणून सुष्मिताची संभावना करण्यात आली होती. त्यात सुष्मिताच्या भावानं राजीवनं देखील बहिणीची बाजु घेतली होती.

आता सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉनं सुष्मिताला मोलाचा सल्ला दिला आहे. त्यानं सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यानं सुष्मिताला अप्रत्यक्षपणे काही सुचनाही केल्या आहेत. रोहमन म्हणतो, मी अजुनही माझ्या हॅशटॅग रोहमन आस्किंग वर ज्यांनी मला त्या प्रश्नांची उत्तरं पाठवली आहे ती वाचत आहे. काहींची उत्तरं वाचून मला वाईट वाटलं. सगळेजण प्रेमात दुखी होतात. मित्रांनो तुम्ही तुमच्या पार्टनकडून प्रमाणापेक्षा जास्त काही अपेक्षा तर करत नाही ना, असा प्रश्न रोहमननं विचारला आहे.

हेही वाचा: Liger Trailer: लायगरच्या ट्रेलरसाठी एकच शब्द, 'कडक'

एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या पार्टनरचं पण एक आयुष्य आहे. तेव्हा जे काही करायचे ते विचार करुन करा. तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त कुणावर अवलंबून राहु नका. त्याचा तुम्हाला त्रास होईल. आता तुम्हालाच तुमची लढाई जिंकावी लागणार आहे. लोकांना काय बोलायचे असेल ते बोलू द्या. त्याची काळजी करु नका. असे मला सांगायचे आहे.

हेही वाचा: Nana Patole Viral Video | चित्रा वाघांकडून नाना पटोलेंचा ओके कार्यक्रम

Web Title: Sushmita Sen Lalit Modi Love Story Ex Boyfriend Rohman Shawl Insta Video Viral Partner Said

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top