esakal | नको ते लग्न! बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहतात या अभिनेत्री 
sakal

बोलून बातमी शोधा

sushmita and mugdha

तुझ्या-माझ्या 'लिव्ह-इन'ला आणखी काय हवंय?

नको ते लग्न! बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इनमध्ये राहतात या अभिनेत्री 

sakal_logo
By
स्वाती वेमूल

लग्नाच्या बंधनात न अडकता प्रियकर किंवा प्रेयसीसोबत एकत्र राहणं म्हणजे लिव्ह-इन रिलेशनशिप. भारतीय समाजात जरी अशा नात्याला मोकळेपणाने स्वीकार केला जात नसला तरी अनेक सेलिब्रिटी हा पर्याय निवडताना दिसतात. असे काही बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा आहेत, जे लग्नाविना सहजीवन व्यतीत करत आहेत. पण आजही या नात्याला समाजमान्यता नसल्याने त्याविषयी उघडपणे बोललं जात नाही. लिव्ह-इनचा पर्याय निवडणारे सेलिब्रिटी कोण आहेत, ते पाहुयात..

माही गिल- अभिनेत्री माही गिल तिच्या बॉयफ्रेंडसोबत मुंबईत राहते. माहीचं खरं नाव रिंपी कौर आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात पंजाबी चित्रपटांमधून केली. बॉलिवूडमध्ये तिने देव डी, नॉट अ लव्ह स्टोरी, साहेब बीवी और गँगस्टर, पानसिंह तोमर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. 

अॅमी जॅक्सन- अभिनेत्री अॅमी जॅक्सन तिचा प्रियकर जॉर्जसोबत राहते. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे. जॉर्ज आणि अॅमीने साखरपुडा केला, मात्र लग्न नाही केलं. 

मुग्धा गोडसे- अभिनेता राहुल देव आणि मुग्धा गोडसे यांची लव्हस्टोरी चर्चेत होती. हे दोघं पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. 

सुश्मिता सेन- सुश्मिता आणि रोहमन शॉल यांच्या वयात फार अंतर आहे. त्यामुळे ही जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. सुश्मिताने तीन मुलींना दत्तक घेतलं असून एकीचं लग्न झालं आहे. रोहमन आणि सुश्मिता लिव्ह इनमध्ये राहतात. 

loading image