esakal | मी वयाच्या ४५व्या वर्षीही करते घोडचुका- सुष्मिता सेन
sakal

बोलून बातमी शोधा

sushmita sen

मी वयाच्या ४५व्या वर्षीही करते घोडचुका- सुष्मिता सेन

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडची ब्युटी क्विन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सुष्मिता सेनने Sushmita Sen नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. सुष्मिताने या पोस्टमधून तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केला आहे. सुष्मिताने तिचा एका सुंदर फोटो शेअर करून त्याला दिलेल्या कॅप्शनमधून तिचे विचार व्यक्त केले आहेत. सुष्मिताच्या चाहत्यांना नेहमी प्रश्न पडतो की ती कधी निराश होते का किंवा निराश झाल्यास ती काय करते? या प्रश्नाचे उत्तर सुष्मिताने या पोस्टमध्ये दिले आहे. (Sushmita Sen said she still makes big blunders in choices At 45)

फोटो शेअर करून सुष्मिताने कॅप्शन दिले की, 'अनेकजण मला विचारतात की मी सुट्ट्या घेते का? होय, मी सुट्ट्या आवर्जून घेते. मी नेहमी सकारात्मक राहते का? तर नाही. वयाच्या 45 व्या वर्षीही मी निवडींबाबत अनेकदा घोडचुका करते. मला अनेक वेळा मानसिक त्रासदेखील होतो. माझ्या स्वभावाचा वापर करण्यामागे लोकांचा वाईट स्वभाव आणि त्यासाठी बोललं जाणारं खोटं या सर्वांचा सामना मीसुद्धा करते. या सगळ्यांतून मी हे शिकले की, हे सर्व सहन करायला कितीही कठीण असलं तरी त्याकडे कर्माचं कर्ज म्हणूनच पाहिल पाहिजे. त्याची संपूर्ण परतफेड केली जाईल याची आशा आहे. या गोष्टींमध्ये जे लोक कारणीभूत असतील त्यांचं कर्म आता कुठे सुरू झालं आहे.' सुष्मिताच्या या पोस्टवर कमेंट करून अनेकांनी तिच्या विचारांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: कधी गच्चीवर, कधी अंगणात.. प्रिया बापटचं लॉकडाउन फोटोशूट हिट

सुष्मिताच्या बॉलिवूडमधील बीवी नंबर वन, फिलहाल, मैने प्यार क्यु किया, दुल्हा मिल गया या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर तिने या क्षेत्रामधून ब्रेक घेतला. सुष्मिताने 'आर्या' या वेब सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पुन्हा कमबॅक केला.

हेही वाचा: 'राणादा'ने का घेतली आशुतोष गोवारीकरांची भेट?