esakal | 'राणा दा'ने का घेतली आशुतोष गोवारीकरांची भेट?
sakal

बोलून बातमी शोधा

hardeek joshi and ashutosh gowariker

'राणादा'ने का घेतली आशुतोष गोवारीकरांची भेट?

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

मराठी मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधील Tujhyat Jeev Rangala) राणा दाची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशीने Hardeek Joshi त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेमधील अक्षया देवधर आणि हार्दिकच्या जोडीला सर्वांची पसंती मिळाली होती. हार्दिक त्याच्या विविध प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतो. नुकतीच हार्दिकने बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आशुतोष गोवारीकर Ashutosh Gowariker यांची भेट घेतली. हार्दिकने त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हार्दिक लवकरच बॉलिवूड चित्रपटामध्ये दिसणार का, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला. (tujhyat jeev rangala fame actor hardeek joshi meets filmmaker ashutosh gowariker)

हार्दिकने आशुतोष गोवारीकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करून कॅप्शन दिले, 'चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याबद्दल लहानपणापासूनच मला कौतुक वाटत होते. त्यांना प्रत्यक्षात पाहून मला फार आनंद झाला. मी अनेक वर्षांपासून ज्यांच्या चित्रपटांचा आनंद घेत होतो, अशा या महान व्यक्तीला भेटणे हा एक अविस्मरणीय क्षण होता.' हार्दिक पहिल्यांदाच आशुतोष यांना भेटला होता.

हेही वाचा: Video : ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचा अफलातून डान्स पाहिलात का?

आशुतोष गोवारीकर यांनी लगान, जोधा अकबर, स्वदेस, या बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटाचे देखील त्यांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्राने केली.

हेही वाचा: Dilip Joshi : कधीकाळी ५० रुपये कमावणाऱ्या 'जेठालाल'ला आता मिळतं इतकं मानधन