सुसानने फेक मेलची लिंक केली ओपन, इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 20 October 2020

सुझान सध्या सोशल मीडियावर बराचकाळ अॅक्टिव्ह असते. तिला आलेल्या एका फेक मेलच्या लिंकवर तिने क्लिक केले. ते तिला चांगलेच महागात पडले आहे. यानंतर संबंधित यंत्रणेकडे तक्रार केल्यानंतर तिचे अकाऊंट पूर्ववत झाल्याचे तिने म्हटले आहे.

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द कलाकार ऋतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुसान एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. सुसानला आलेल्या एका फेक मेलच्या लिंकने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. याबाबतची माहिती तिने आपल्या सोशल अकाऊंटवरुन दिली आहे. आपल्यासोबत झालेला हा प्रकार इतर कुणाबाबत होऊ नये यासाठी एक पत्रही प्रसिध्द केले आहे. यापूर्वीही काही कलाकारांचे सोशल अकाउंट हॅक होवून त्यावरुन अनेक मेसेज व्हायरल झाले होते.

सुझान सध्या सोशल मीडियावर बराचकाळ अॅक्टिव्ह असते. तिला आलेल्या एका फेक मेलच्या लिंकवर तिने क्लिक केले. ते तिला चांगलेच महागात पडले आहे. यानंतर संबंधित यंत्रणेकडे तक्रार केल्यानंतर तिचे अकाऊंट पूर्ववत झाल्याचे तिने म्हटले आहे. यासगळ्या प्रकाराबाबत सुझानने आपल्या चाहत्यांना सावधान केलं आहे. कुठलाही सोशल मीडिया वापरत असताना काळजी घ्यायला हवी असे तिने म्हटले आहे. याविषयी कुठली काळजी घ्यावी यासाठी तिने एक पत्र लिहिले आहे.

त्या पत्रात ती म्हणते, माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. याचे महत्वाचे कारण म्हणजे. माझा मेल आयडीही हॅक करण्यात आला होता. ज्यावेळी मी इन्स्टा ओपन केले त्यावेळी काही चूकीच्या गोष्टी माझ्यासमोर आल्या. एका बनावट मेलची लिंक ओपन करणे मला त्रासदायक ठरले आहे. तुम्हीही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असताना खबरदारी घ्यायला हवी. अन्यथा मोठ्या परिणामाला सामोरं जावं लागेलं. सोशल मीडिया युझर्सने आपली माहिती ही अधिक सुरक्षित कशी राहिल याकडे लक्ष द्यावे. सध्य़ाच्या काळात मोठ्या प्रमाणावर सायबरचे धोके आपल्यापुढे निर्माण झाले आहेत. यासगळ्यात मला इन्स्टाग्रामच्या सहका-यांचे आभार मानायचे आहेत की ज्यांनी तातडीने याप्रकाराची दखल घेत माझे हॅक झालेले इन्स्टाग्रामचे अकाऊंट पूर्ववत करुन दिले. 

 

लॉकडाऊनच्या काळात सुझानने आपला वेळ आपल्या परिवारासमवेत घालवला आहे. ऋतिक आणि तिने रिहान आणि रिधन या मुलांसाठी वेळ दिला आहे. विशेष म्हणजे या दोघांचा घटस्फोट झाला असून गेल्या काही काळापासून त्यांच्यातील प्रेमाचा बंघ आणखी घट्ट होताना दिसत आहे. वॉर या चित्रपटात ऋतिक दिसला होता. त्याच्या नव्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sussanne Khans Instagram account gets hacked