esakal | अशी सुरू झाली सुयश-आयुशीची लव्हस्टोरी
sakal

बोलून बातमी शोधा

suyash tilak engagment

अशी सुरू झाली सुयश-आयुशीची लव्हस्टोरी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सुयश टिळकने Suyash Tilak नुकताच अभिनेत्री व डान्सर आयुशी भावे Ayushi Bhave हिच्याशी साखरपुडा केला. सुयशने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. आयुशी ही 'युवा डान्सिंग क्वीन'ची माजी स्पर्धक आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट झाल्यानंतर त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आयुशीसोबत पहिली भेट कशी झाली, लग्न कधी करणार आणि भूतकाळातील रिलेशनशिप्सच्या चर्चांवर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुयश व्यक्त झाला. (Suyash Tilak and Aayushi bhave love story and south indian themed ring ceremony)

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सुयश म्हणाला, 'एका कार्यक्रमात आम्हा दोघांची पहिल्यांदा भेट झाली. पहिल्या भेटीतच आमच्यात चांगली मैत्री झाली होती आणि हळूहळू त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आम्हा दोघांच्या आवडीनिवडी जवळपास सारख्याच आहेत. दोघांनाही फिरायला आवडतं, पाळीव प्राणी आवडतात. माझ्या पुण्याच्या घरीच साखरपुड्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मोजके पाहुणेच या कार्यक्रमाला उपस्थित होते.'

हेही वाचा: कोण आहे सुयश टिळकची होणारी पत्नी?

सुयश आणि आयुशीने साखरपुड्यासाठी साऊथ-इंडियन स्टाइल पोशाख केला होता. या दोघांच्या साऊथ-स्टाइल साखरपुड्याबाबत नेटकऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केला होता. त्याबद्दल सुयशने पुढे सांगितलं, 'आम्हा दोघांनाही दाक्षिणात्य संस्कृती आणि गाणी प्रचंड आवडतात. आम्हाला दाक्षिणात्य संस्कृतीशी संबंधित लूक करायला होता. त्यामुळे साखरपुड्यासाठी आम्ही तसा पोशाख निवडला. लग्नाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही. मात्र या वर्षाच्या अखेरीस आम्ही दोघं लग्नबंधनात अडकू.'

सुयश आणि आयुशी यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कमालीची गुप्तता पाळली होती. याबद्दल सुयश म्हणाला, 'आयुशी आणि मला आमचं खासगी आयुष्य खासगीच ठेवायचं होतं. माझ्यापेक्षा जास्त लोकांनीच माझ्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल चर्चा केली होती. ज्या गोष्टी कधी घडल्यात नव्हत्या, त्या सुद्धा चवीने चघळल्या गेल्या. माझ्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल बोलायचे झाल्यास, आमच्यात तेव्हासुद्धा चांगली मैत्री होती आणि आतासुद्धा आहे. याबाबत आयुशी खूपच समजूतदार आहे आणि मला या गोष्टी तिला समजून द्याव्या लागल्या नाहीत. मला समजून घेणारी जोडीदार मला मिळाली, त्यामुळे मी स्वत:ला खूप नशिबवान समजतो.'

loading image