Animal Movie: "स्त्री - पुरुष समानता विचारांवर श्रद्धांजली", स्वानंद किरकिरेंची 'अ‍ॅनिमल'वर तीव्र नाराजी

लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरेंनी अ‍ॅनिमलवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीय
swanand kirkire slams ranbir kapoor animal movie
swanand kirkire slams ranbir kapoor animal movie SAKAL

Animal Movie: 'अ‍ॅनिमल' सिनेमा बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करतोय. अ‍ॅनिमल सिनेमावर काही लोकं कौतुकाचा वर्षाव करत आहेत तर काहीजण टिका करत आहेत. अ‍ॅनिमल रणबीर कपूरच्या करिअरमधला महत्वाचा सिनेमा मानला जात आहे.

अशातच लोकप्रिय गीतकार आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी अ‍ॅनिमलवर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. स्वानंद यांनी ट्विटरवर लांबलचक पोस्ट करुन त्यांची नाराजी उघड केलीय.

(swanand kirkire slams ranbir kapoor animal movie)

swanand kirkire slams ranbir kapoor animal movie
Kangana Ranaut on Election Result: "राम आये है...", भाजपच्या विजयानंतर कंगना रणौतकडून मोदींवर कौतुकाचा वर्षाव

स्वानंदवर ट्विटरवर पोस्ट करुन लिहीतात, "विकास बहलचा क्वीन, शूजित सरकारचा पिकू आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील असे अनेक चित्रपट ज्यांनी मला स्त्रीचा, तिच्या अधिकारांचा आणि तिच्या स्वायत्ततेचा आदर करायला शिकवला. आणि सर्व काही समजून घेतल्यानंतरही या विचारसरणीत अजूनही अनेक कमतरता आहेत. मी यशस्वी झालो की नाही माहीत नाही, पण आजही मी स्वत:ला सुधारण्याचा सतत प्रयत्न करत असतो. यासाठी सिनेमांचे आभार.

गीतकाराने पुढे लिहिले की, "पण 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट पाहिल्यानंतर मला आजच्या पिढीतील महिलांची खरोखरच कीव आली. आता तुमच्यासाठी एक नवीन माणूस तयार केला गेला आहे, जो अधिक भितीदायक आहे, जो तुमचा तितका आदर करत नाही आणि जो तुमच्यावर नियंत्रण ठेवू इच्छितो. जेव्हा आजच्या पिढीतील मुली रश्मिकाचे कौतुक करत होत्या, तेव्हा मनातल्या मनात मी समानतेच्या प्रत्येक विचारांना श्रद्धांजली वाहिली. मी उदास, निराश आणि हतबल होऊन घरी आलो आहे."

स्वानंद शेवटी लिहीतात, "रणबीरचा एक संवाद ज्यामध्ये तो अल्फा पुरुषाची व्याख्या करतो, आणि म्हणतो की, जे पुरुष अल्फा बनू शकत नाहीत, ते सर्व स्त्रियांचा आनंद मिळवण्यासाठी कवी बनतात आणि चंद्र-तारे तोडण्याचे वचन देतात. मी कवी आहे, जगण्यासाठी कविता करतो. एक चित्रपट प्रचंड कमाई करत आहे. आणि त्या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरवशाली इतिहास लाजिरवाणा केला आहे. माझ्या समजुतीनुसार हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य भयानक आणि धोकादायक होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com