esakal | ‘सिर्फ आकडे इधर मौत के उधर सीटों के’

बोलून बातमी शोधा

Swanand kirkire tweete about election and corona

‘सिर्फ आकडे इधर मौत के उधर सीटों के’

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई- देशात सध्या पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम, पुदुचेरी या पाच राज्यांच्या निवडणूकांतचे निकाल जाहिर होत आहेत. एकीकडे देशाचे लक्ष या निवडणूकींच्या आकडेवारीकडे लागलेले असतानाच दुसरीकडे रूग्णालयांमध्ये रूग्णांची आकडेवारी वाढत आहे. या दोनही आकड्यांबद्दल प्रसिध्द गीतकार आणि गायक स्वानंद किरकीरे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

फक्त आकडे तिकडे मृत्युंचे तर इकडे जागांचे रोज लाजेने मान खाली घालत लढणाऱ्या डॉक्टर,नर्सेसचेही आकडे कुठेतरी असतील अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहीले,‘सिर्फ़ आँकड़े इधर मौत के उधर सीटों के. कहीं तो होंगे आँकड़े शर्म से झुकते सरों के रोज़ जूझते लड़ते नर्सों डाक्टरों के’ या ट्विटला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. प्रसिध्द गायक विशाल दादलानीने हे ट्विट रिट्विट केले. याच विषयासंदर्भात स्वानंद यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहीले,’इमेज की चिंता है, हमे बस इमेज की चिंता.. चाहे मरे आवाम निरंतर जले चिता.’

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रूग्णांना रूग्णालयातमध्ये वैद्यकिय सुविधा उपलब्ध होत नाहित, तर स्मशानभूमीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शवांना अंतिमसंस्कार करायला जागा मिळत नाहिये अशावेळी देशात निवडणूकांना किती महत्व दिले पाहिजे असा सवाल स्वानंद यांनी या ट्विटमधून केला आहे. स्वानंद यांनी बालगंधर्व, देऊळ या प्रसिध्द चित्रपटांमधील गीतांचे लेखन केले आहे.