
Swapnil Joshi: मराठी भाषेवरनं स्वप्निलची नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले,'जोशी..'
Swapnil Joshi: मराठीतला सुपरस्टार म्हणून स्वप्निल जोशी सर्वप्रचलित असला तरी हिंदी इंडस्ट्रीतही त्यानं केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्यानं साकारलेला कृष्ण तर आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.
स्वप्निल हा खरंतर रोमॅंटिक सिनेमातला हिरो..चॉकलेट बॉयच म्हणूया नं त्याला. 'दुनियादारी', 'तु ही रे', 'मितवा' अशा त्याच्या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली.
आता त्याच्या नव्यानं भेटीस आलेल्या 'वाळवी' सिनेमात तो एकदम वेगळ्या भूमिकेतून समोर येत आहे. 'वाळवी' मध्ये त्यानं खूप वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली आहे.
असा मराठी प्रेक्षकांचा फेव्हरेट असणारा स्वप्निल जोशी सध्या मात्र सोशल मीडियावर ट्रोल होतोय ते मराठी प्रेक्षकांकडून. नेमकं झालं तरी काय? चला जाणून घेऊया..
हेही वाचा: Shahid Kapoor च्या घरात भाड्यानं राहणार कार्तिक आर्यन..एका महिन्याचं भाडं ऐकाल तर फिरतील डोळे..
स्वप्निल जोशीनं आपल्या ट्वीटर अकाउंटवर रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुखच्या 'वेड' सिनेमांन ५० करोडचा टप्पा बॉक्स ऑफिसवर गाठला म्हणू कौतूक करणारी एक पोस्ट केली. पण त्यावरनं त्याची नेटकऱ्यांनी मात्र शाळा घेतली. या पोस्टमध्ये स्वप्निलच्या मराठीतील अशुद्ध लिखाणावर ट्रोलर्सनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
स्वप्निलनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल ! केवळ क. मा. ल. कामगिरी ! मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन
भाऊ,
वैनी आणि पूर्ण टीम!
आता या पोस्टमधील तीन शब्द वैनी, पाउल आणि पाढते....हे चुकले अन् नेटकऱ्यांनी स्वप्निलची मराठी भाषेवरनं शाळा घ्यायला सुरुवात केली. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'वहिनी not वैनी रे, म्हणून मराठीत बोला ,आणि मराठी SRK cha बालिश ढोंग करू नका'... तर एकानं लिहिलं आहे,'मराठी व्यवस्थित लिहा जोशी आधी, पाढते? वैनी? पाउल?'