Shahid Kapoor च्या घरात भाड्यानं राहणार कार्तिक आर्यन..एका महिन्याचं भाडं ऐकाल तर फिरतील डोळे.. | Kartik Aaryan News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid Kapoor and Kartik Aaryan News

Shahid Kapoor च्या घरात भाड्यानं राहणार कार्तिक आर्यन..एका महिन्याचं भाडं ऐकाल तर फिरतील डोळे..

Kartik Aaryan News: कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून स्वतःसाठी एक सुंदर घर शोधत होता...आता कुठे जाऊन त्याला आपलं आवडतं घर मिळालं आहे. हे घर कोणा दुसऱ्या-तिसऱ्याचं नसून दस्तुखुद्द् शाहिद कपूरचं आहे. शाहिदचं हे घर जुहू मध्ये आहे.

बोललं जात आहे की कार्तिक दर महिन्याला या घरासाठी मोठी रक्कम मोजणार आहे.(Kartik Aaryan finalized shahid kapoor fancy juhu home for rs.7 and 50 lakh)

हेही वाचा: Rakhi Sawant Arrested : राखी सावंतला पोलिसांकडून अटक

एका इंग्रजी वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार,तीन वर्षांचा करार शाहिद आणि कार्तिकमध्ये झाला आहे. कार्तिकनं ४५ लाख रुपये सिक्यॉरिटी डिपॉझिट तत्वावर भरले आहेत.

या करारानुसार कार्तिक शाहिद कपूरला एक वर्षापर्यंत ७.५० लाख रुपये भाडं दर महिन्याला देणार आहे. आणि प्रत्येक वर्षी म्हणे ७ टक्के रक्कम भाड्यात वाढवली जाणार आहे.

म्हणजे दुसऱ्या वर्षात शाहिद कपूर ८.२ लाख रुपये दर महिन्याला भरणार आणि तिसऱ्या वर्षी ही रक्कम वाढून ८.५८ लाख रुपये इतकी होईल.

हेही वाचा: Ved Movie Box Office Collection: फक्त काही तास आणि 50 कोटी! रितेशचा 'वेड' रचणार नवा विक्रम..

माहितीसाठी थोडक्यात इथे सांगतो की, शाहिद कपूरच्या या लक्झरीयस अपार्टमेंटचा एरिया 3681 sq.ft मध्ये पसरलेला आहे,ज्याला दोन स्वतंत्र पार्किंग स्लॉट देखील आहेत.

एका न्यूज पोर्टलला मिळालेल्या बातमीनुसार,कार्तिकची आई माला तिवारी आणि शाहिदची पत्नी मीरा राजपूत यांनी स्टॅम्प ड्युटी आणि ३६ महिन्यांच्या लीज रजिस्ट्रेशन प्रोसेसचं काम पूर्ण केलं आहे.

हेही वाचा: Bigg Boss 16: 'हे मराठी बिग बॉस आहे का?' अर्चनानं पुन्हा डिवचलं..शिव ठाकरेचं सडेतोड उत्तर वाचाच एकदा

काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर आपल्या कुटुंबासोबत जुहू येथील घरातून निघून प्रभादेवी स्थित ड्युप्लेक्स आपार्टमेंटमध्ये राहण्यास गेला आहे. २०१८ मध्ये शाहिदनं ८,६२५ स्क्वे.फीट एरियात पसरलेल्या आपल्या आलिशान घरासाठी ५५.६० करोड खर्च केले होते.

कार्तिक आर्यन आतापर्यंत वर्सोवा मध्ये ४५९ स्क्वे.फिट एरिया असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत होता. जे त्यानं २०१९ मध्ये जवळपास २ करोडच्या आसपास खरेदी केलं होतं.