स्वप्नील जोशी म्हणतो 'मी पण सचिन'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मी पण सचिन नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका ध्येयवेड्या माणसाची गोष्ट सांगणारा आहे. नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशनल साँग चित्रित करण्यात आले. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसत असून एका खेडेगावातील बाजारात हे गाणे चित्रित झाले आहे. सचिनचे भव्य पोस्टरही या गाण्यात झळकत आहेत. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच उत्साहपूर्ण वातावरणात गाण्याचे चित्रीकरण झाले आहे.

मुंबई- मी पण सचिन नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका ध्येयवेड्या माणसाची गोष्ट सांगणारा आहे. नुकतेच या चित्रपटाचे प्रमोशनल साँग चित्रित करण्यात आले. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसत असून एका खेडेगावातील बाजारात हे गाणे चित्रित झाले आहे. सचिनचे भव्य पोस्टरही या गाण्यात झळकत आहेत. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच उत्साहपूर्ण वातावरणात गाण्याचे चित्रीकरण झाले आहे.

'आयला आयला सचिन' हे गाणं आदित्य पाटेकर यांनी स्वरबद्ध केले आहे. तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. सचिन तेंडुलकर यांना या गाण्याद्वारे ट्रिब्युट देणार आहोत. यावेळी स्वप्नील बोलताना म्हणाला की, हा सिनेमा फक्त क्रिकेट वर आधारित नसून आयुष्यावर पण तितकाच आधारित आहे. कारण आयुष्य आणि क्रिकेट मध्ये खूप साम्य असते. क्रिकेट आणि आयुष्यात मध्ये आपण पुढच्या क्षणाला काय होईल ह्याचा अंदाज बंधू शकत नाही. 

इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' चित्रपट येत्या 1 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, संजय छाब्रिया, निखिल फुटले आणि गणेश गीते या चित्रपटाचे निर्माते असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swapnil Joshi says 'I am Sachin'