
लेखक सुहास शिरवळकर यांच्या 'समांतर' या कादंबरीवर आधारित 'समांतर' ही वेब सिरीज दिग्दर्शक सतीश राजवाडे घेऊन आलेत..या निमित्ताने समांतरच्या टीमशी आम्ही बातचीत केलीये..
लेखक सुहास शिरवळकर यांच्या 'समांतर' या कादंबरीवर आधारित 'समांतर' ही वेब सिरीज दिग्दर्शक सतीश राजवाडे घेऊन आलेत..आपल नशीब आपण घडवत असतो या गोष्टीवर अनेकांचा विश्वास असतो मात्र, खरंच आपण आपलं नशीब जगतोय का? याच आशयाला अनुसरून एक चित्तथरारक कथा वेबसिरीजच्या रूपात तुमच्या भेटीला आलीये...या निमित्ताने समांतरच्या टीमशी आम्ही बातचीत केलीये..
समांतर वेबसिरीज : एकाचा भूतकाळ; तर दुसऱ्याचं भविष्य!
या वेबसिरीजविषयी दिग्दर्शक सतिश राजवाडे सांगतात, ''7 ते 8 वर्षांपूर्वी ही कादंबरी वाचल्यापासून यावर काहीतरी कलाकृती करावी हे निश्चित केलं होतं..पण एवढी सस्पेन्स थ्रीलर कथा सिनेमात सांगून त्याला न्याय देता आला नसता म्हणून डि़जीटल हे व्यासपीठ निवडलं..त्यानंतर मी आणि स्वप्निल अडीच वर्षांपासून यावर काम करतोय... सुहास शिरवळकरांची ही कथा साकारताना मला फार आनंद होतोय. ही कथा वेबसिरीजच्या निमित्ताने तसेच स्वप्नील आणि तेजस्विनीमुळे एका वेगळ्या उंचीवर जाईल हे नक्कीच....याआधीदेखील वेबसिरीजसाठी अनेकवेळा अनेकजणांनी विचारणा केली पण मला याच कथेतून डिजीटलमध्ये पदार्पण करायचं होतं...आणि मी यासाठी मिसेस शिरवळकर यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतका वेळ देऊन आमच्यावर विश्वास दाखवला...
कुमार महाजन साकारत असलेला स्वप्नील जोशी त्याच्या भूमिकेविषयी सांगतो, "याआधी मी अनेक रोमँटीक, चॉकलेट बॉय इमेजमधून प्रेक्षकांसमोर आलोय पण पुन्हा वेबसिरीजमध्ये मी अशाच प्रकारची भूमिका केली तर प्रेक्षक मला का स्विकारतील..त्यामुळे ही भूमिका वेगळी आहे आणि माझ्यासाठी आव्हानात्मक देखील..यात अनेकवेळा मला इमोशनलेस व्हायला लागायचं..मी सारखं स्वतःला समजवत असायचो की माझी नास्तिक ही भूमिका असल्याने मला कोणत्याच गोष्टीवर रिऍक्ट व्हायचं नाही आहे...मी आणि सतीश गेली दोन अडीच वर्ष याच व्यासपीठाची वाट पाहत होतो.. शिरवळकरांचं एक पान पलटलं की दुस-या पानावर धक्कातंत्र असतंच आणि हे मी दुनियादारी पासूनंच अऩुभवंत आलो आहे, म्हणूनंच आम्हाला ते अधिक उत्कंठावर्धकत बनवण्यासाठी हे वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणं जास्त योग्य वाटलं..."
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तेजस्विनी पंडित 'समांतर' विषयी सांगते " समांतरसाठी माझी निवड सतीश राजवाडे यांनी नाही तर सुहास शिरकवळकर यांनीच केली असं मी म्हणेन..माझी भूमिका पाहून कोणीही म्हणेल की ही तर साधीच नेहमीची भूमिका आहे पण सध्या एखादी भूमिका रिलेटेबल असणँ खूप महत्वाचं असतं आणि माझी भूमिका ही अनेकांना आपल्यातलीच एक वाटेल अशी आहे..समांतर ही पहिली मराठी वेबसिरीज आहे जी मराठी व्यतिरिक्त इतर तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणारे...वेब हे माध्यम आम्हा कलाकारांना एक चांगली संधी उपलब्ध करून देत ज्यात आम्हाला खूप काही शिकायला मिळत आहे. ही वेबसिरीज प्रत्येकाला शेवट पर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल..."
अभिनेत्री तेजस्वीनी पंडित स्वप्नील जोशीच्या पत्नीची भूमिका साकारत असून ९ भागांची ही वेबसिरीज असणारे. यात इतरही कलाकार असण्याची उस्तुकता पुढच्या भागात ताणून ठेवण्यात आली आहे... समांतरची ही कथा अनेकांपर्यंत पोहचावी यासाठी ही वेबसिरीज मराठी सोबतंच हिंदी , तमिळ आणि तेलूगू या भाषेतसुद्धा 13 मार्चला एकाचवेळी प्रदर्शित होणारे..एमएक्स प्लेअरवर ही वेबसिरीज तुम्हाला निशुल्क पाहायला मिळेल..
swapnil joshi will debut on digital by samantar web series